शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

देशातील ९९४ मालमत्तांवर 'वक्फ बोर्ड'चा बेकायदेशीर कब्जा; संसदेत आकडेवारीच मांडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 08:12 IST

मंत्रालयाने दिलेल्या यादीत ३२ केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांचा उल्लेख करण्यात आला असून या यादीत प्रत्येक राज्यात किती वक्फ मालमत्ता आहेत याची माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - देशातील एकूण ९९४ संपत्तीवर वक्फद्वारे अवैधरित्या अतिक्रमण करण्याच्या तक्रारी आहेत. ज्यात एकट्या तामिळनाडूत सर्वाधित ७३४ मालमत्तेचा समावेश आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते जॉन ब्रिटास यांनी विचारलेल्या प्रश्नावर संसदेतकेंद्र सरकारने लिखित उत्तर दिले आहे. अल्पसंख्याक मंत्रालयाने वक्फबाबत असलेल्या माहितीचा हवाला देत देशात वक्फ अधिनियम अंतर्गत ८७२,३५२ स्थावर आणि १६,७१३ जंगम वक्फ मालमत्ता नोंदणीकृत आहेत.

अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की, माहितीनुसार, ९९४ संपत्तीवर अवैधरित्या वक्फने कब्जा केला आहे. देशातील एकूण ९९४ संपत्तीपैकी तामिळनाडूत सर्वाधिक ७३४ संपत्तीचा समावेश आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश १५२, पंजाब ६३, उत्तराखंड ११, जम्मू काश्मीर १० मालमत्तेचा समावेश आहे. त्याशिवाय केंद्र सरकारकडून २०१९ नंतर वक्फ बोर्डाला कुठलीही जमीन उपलब्ध करू दिली नाही. २०१९ पासून आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने वक्फ बोर्डाला दिलेल्या जमिनीची माहिती प्रश्नोत्तरात विचारण्यात आली त्यावर केंद्रीय निवास आणि शहर मंत्रालयाकडून ही माहिती राज्यसभेत देण्यात आली.

उत्तर प्रदेशमध्ये WAMSI वर सर्वाधिक २,३२,५४७ स्थावर मालमत्ता नोंदणीकृत आहेत. मंत्र्याने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, त्यात २,१७,१६१ सुन्नी आणि १५,३८६ शिया मालमत्ता आहेत. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८०,४८० वक्फ मालमत्ता आहेत, तर पंजाबमध्ये ७५,९६५ वक्फ मालमत्ता आहेत. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ६६,०९२ स्थावर मालमत्ता आहेत, कर्नाटक पाचव्या क्रमांकावर असून तिथे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत ६२,००० हून अधिक मालमत्तांची नोंदणी आहे अशी माहिती देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा

लातूर जिल्ह्यातील ३०० एकर जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण येथे सुनावणी सुरू आहे. त्यातून जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार आहे. लातूरमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याचं पुढे येताच राजकीय वर्तुळात खळबळ माजली. त्यानंतर सत्ताधारी भाजपासह शिवसेनेने यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, वक्फ बोर्डाने दुष्प्रचार केला आहे. अनेक मालमत्ता हिंदू देवी देवता मंदिरे, हिंदू ट्रस्ट आणि शेतकऱ्यांच्या आहेत, परंतु त्यांनी त्यांची जबरदस्तीने त्यांच्या नावावर नोंदणी केली आहे असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदMuslimमुस्लीमCentral Governmentकेंद्र सरकार