शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

"आजोबांप्रमाणे तुम्हाला बॉम्बने उडवून देईन…", काँग्रेस खासदाराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 20:00 IST

खासदार रवनीत सिंग बिट्टू तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 1995 मध्ये हत्या झालेल्या बेअंत सिंग यांचे ते नातू आहेत.

पंजाबमधील लुधियाना येथील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. खासदार रवनीत सिंग बिट्टू यांना बॉम्बने उडवून देईन, असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे. आरोपीने स्वत:ला वारिस पंजाब डे चीफ अमृतपाल सिंगसोबत असल्याचे सांगितले आहे. तसेच, खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या विरोधात बोलणे थांबवले नाही, तर तुमच्या आजोबांप्रमाणे तुम्हाला उडवून देईन, असे आरोपीने म्हटले आहे. दरम्यान, खासदार रवनीत सिंग बिट्टू तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 1995 मध्ये हत्या झालेल्या बेअंत सिंग यांचे ते नातू आहेत.

गुरुवारी अमृतपाल सिंगच्या समर्थकांनी बॅरिकेड्स तोडून अजनाळा येथील पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश केला. काहींच्या हातात तलवारी आणि बंदुका होत्या. हे समर्थक अमृतपालचा अटक करण्यात आलेला सहकारी लवप्रीत सिंग उर्फ ​​तुफान याच्या सुटकेची मागणी करत होते. अपहरणाचा आरोपी लवप्रीत शुक्रवारी तुरुंगातून बाहेर आला आहे.

लुधियानाचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी सांगितले की, त्यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने फोनवर धमकी दिली आहे. खासदार रवनीत सिंग बिट्टू सध्या छत्तीसगडमधील काँग्रेसच्या 85 व्या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. अमृतपाल सिंग यांच्याविरोधात बोलणे थांबवा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे फोन करणाऱ्याने मला सांगितले असल्याचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी सांगितले.

धमकीची तक्रार दाखलदुबईहून परतलेला अमृतपाल सिंग वारिस पंजाब डे संघटनेचा प्रमुख आहे. या संघटनेची स्थापना अभिनेता दीप सिद्धूने केली होती, ज्याचा गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. लुधियानाच्या घुमर मंडी पोलिस स्टेशनचे प्रभारी उपनिरीक्षक सतनाम सिंह भुल्लर यांनी सांगितले की, खासदार रवनीत सिंग बिट्टू यांना मिळालेल्या धमकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अशा धमक्यांना आपण घाबरत नसल्याचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी म्हणणे आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाब