शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

...तर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का; मोदी सरकारला भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 19:12 IST

आयएलअँडएफएस कंपनीला वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न

नवी दिल्ली: इन्फ्रस्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसच्या (आयएलअँडएफएस) रुपात आम्ही केवळ एका कंपनीला नव्हे, तर आर्थिक संकटाच्या समुद्रात सापडलेल्या टायटॅनिकला वाचवत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आयएलअँडएफएस कंपनी बुडाल्यास अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो, अशी माहिती केंद्र सरकारनं न्यायालयाला दिली. आयएलअँडएफएसला वाचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंदेखील सरकारनं न्यायालयाला सांगितलं. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये दाखल केलेल्या 36 पानी याचिकेत केंद्र सरकारनं आयएलअँडएफएस कंपनीचा उल्लेख टायटॅनिक जहाज असा केला आहे. कंपनीच्या संचालकांना व्यवस्थापन सांभाळण्यात अपयश आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. 'आयएलअँडएफएस कंपनीला वाचवणं अतिशय गरजेचं आहे. कारण कंपनीवर 910 अब्ज रुपयांचं कर्ज आहे. यातील दोन तृतीयांश कर्ज सरकारी बँकांचं आहे,' असं सरकारनं याचिकेत म्हटलं आहे. आयएलअँडएफएस कंपनीच्या उपकंपन्यादेखील कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्यास देशाच्या आर्थिक स्थिरतेवर गंभीर परिणाम होतील, असं सरकारनं याचिकेत नमूद केलं आहे. 'आयएलअँडएफएसच्या भांडवल गोळा करण्याच्या आणि पायाभूत प्रकल्प पूर्ण करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्यास त्याचा मोठा फटका पायभूत क्षेत्रासह शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेला बसेल. त्यामुळे मोठं नुकसान होईल,' अशी भीती केंद्र सरकारनं याचिकेतून व्यक्त केली आहे. ‘आयएलअँडएफएस’ ही कंपनी रस्ते, बोगदे, जल प्रक्रिया प्रकल्प आणि वीज प्रकल्पांना गेल्या ३0 वर्षांपासून अर्थसाह्य करते. कर्ज फेडण्यासाठी यापैकी कोणतीही मालमत्ता कंपनी विकू शकत नाही. कंपनीचे ऊर्जा प्रकल्प इंधन आणि खरेदी कराराअभावी अडकले आहेत. रस्ते प्रकल्प पर्यावरण मंजुऱ्यांतून कसेबसे बाहेर काढले गेले, परंतु टोल वसुली पुरेशी नसल्यामुळे नवं संकट निर्माण झालं आहे. महामार्ग प्राधिकरणासोबतच्या वादामुळे काही प्रकल्प रखडले आहेत.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारshare marketशेअर बाजार