शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आयएलएफएस घोटाळा; ईडीचे पहिले आरोपपत्र, ५७0 कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 05:35 IST

आयएलअँडएफएसप्रकरणी ईडीने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि ब्रुसेल्स (बेल्जियम) येथील निवासी व व्यावसायिक इमारती आणि बँक खाती जप्त केलेली आहेत.

नवी दिल्ली : इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस (आयएलअँडएफएस) मनीलाँड्रिंग आणि ५७0 कोटी रुपयांच्या मालमत्तांची जप्ती या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पहिले आरोपपत्र दाखल केले आहे.आयएलअँडएफएसप्रकरणी ईडीने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि ब्रुसेल्स (बेल्जियम) येथील निवासी व व्यावसायिक इमारती आणि बँक खाती जप्त केलेली आहेत. आयएलअँडएफएस फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. (आयएफआयएन) कंपनीच्या संचालकांच्या या मालमत्ता आहेत.मालमत्ता जप्त झालेल्या संचालकांत रवी पार्थसारथी, रमेश बावा, हरी शंकरम, अरुण साहा आणि रामचंद करुणाकरन यांचा समावेश आहे. शिवशंकरन यांच्या कुटुंबियांच्या आणि इतर नातेवाईकांच्या, तसेच समूहातील काही कंपन्यांच्या मालमत्ताही ईडीने जप्त केल्या आहेत. जप्त मालमत्तांची एकूण किंमत ५७0 कोटी रुपये आहे.आयएलअँडएफसी समूहातील अनेक कंपन्यांवर ईडीने १९ फेब्रुवारी रोजी मनीलाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. या कंपन्यांच्या अनेक संचालकांना बेकायदेशीररीत्या लाभ दिल्याचा ईडीचा आरोप आहे.ईडीने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, संचालकांनी एकमेकांशी, तसेच खाजगी संस्थांशी संगनमत करून स्थापित नियमांचे सर्रास उल्लंघन केले. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि कर्जाचे हप्ते थकविणाऱ्या अनेक कंपन्यांना त्यांनी प्रचंड प्रमाणात कर्जे वितरित केली. यातील अनेक कंपन्यांनी ‘आयएफआयएन’कडून घेतलेली कर्जेही थकविलेली होती.शिवा समूहाकडे ४९४ कोटी थकलेईडीच्या तपासात असे आढळून आले की, आपली कमाई अशीच चालू राहावी यासाठी संचालकांनी ‘आयएफआयएन’च्या लेख्यांत हेराफेरी करून कंपनीची पत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.आयएलअँडएफएस समूहाच्या वार्षिक ताळेबंदातही त्यांनी फेरफार केले. या बेकायदेशीर कारवायांमुळे कंपनीचा तोटा आणखी वाढला. याच मोडस आॅपरेंडीचा वापर करून संचालकांनी शिवशंकरन यांच्या शिवा समूहाला बेकायदेशीररीत्या मोठी कर्जे दिली. शिवा समूहाकडे आता ४९४ कोटी रुपये थकलेले आहेत.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय