शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अबब... वार्षिक २ कोटी रुपये वेतन!; आयआयटी खरगपूरमधील विद्यार्थ्याला ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 06:03 IST

IIT Kharagpur Job Offer : खरगपूर येथील विद्यार्थ्यांना उत्तम नोकऱ्यांच्या १६०० संधी चालून आल्या आहेत.

खरगपूर : कोरोनामुळे लागलेला लॉकडाउन आणि त्यामुळे घसरणीला लागलेली अर्थव्यवस्था, या सर्व पार्श्वभूमीवर रोजगाराच्या संधी आटत चालल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, हे चित्र झपाट्याने बदलत असून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. पश्चिम बंगालमधील आयआयटी खरगपूर हे त्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. खरगपूर येथील विद्यार्थ्यांना उत्तम नोकऱ्यांच्या १६०० संधी चालून आल्या आहेत. त्यातील एका विद्यार्थ्याला तर २ कोटी ४० लाख रुपयांच्या वार्षिक वेतनाची ऑफर प्राप्त झाली आहे. यंदा नोकरभरती मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आयआयटी खरगपूरमधील विद्यार्थ्यांना अवघ्या दहा दिवसांत इतक्या रोजगार संधी चालून आल्या आहेत. एका विद्यार्थ्याला २.४ कोटी रुपयांच्या वार्षिक वेतनाची, तर अन्य २२ विद्यार्थ्यांना वार्षिक ९० लाखांपासून पुढे वार्षिक वेतन मिळू शकणार आहे. नोकरभरती मोहिमेचा दुसरा टप्पा नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडणार आहे. आठवडाभरात १५०० जणांना ऑफर्स

  • आयआयटी खरगपूरने आयोजिलेल्या नोकरभरती मोहिमेच्या पहिल्या सात दिवसांत तेथील १५०० विद्यार्थ्यांना जगभरातील अग्रगण्य कंपन्यांनी नोकऱ्यांचे प्रस्ताव दिले. त्यानंतर आणखी १०० विद्यार्थ्यांना असे प्रस्ताव मिळाले.  
  • आयआयटी खरगपूरमधील करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे अध्यक्ष प्रा. ए. राजकुमार यांनी नोकरभरती मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व कंपन्यांचे आभार मानले. 
  • गुगल, मायक्रोसॉफ्ट, मायक्राॅन टेेक्नॉलॉजी, उबेर, हनीवेल, एक्सेल अशा २४५ नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. 
  • सॉफ्टवेअर, हाय-लेव्हल कोडिंग, ॲनालिटिक्स, कन्सल्टिंग, कोअर इंजिनीअर कंपनी, बँकिंग, वित्तीय कंपन्या आदी क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे.
टॅग्स :jobनोकरीgoogleगुगल