शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:50 IST

IIT Baba Abhay Singh Marriage: महाकुंभ फेम 'आयआयटी बाबा' अभय सिंह लग्नानंतर पहिल्यांदाच झाझरमध्ये आले आहेत. आधुनिक विज्ञान आणि अध्यात्म जोडणारी 'श्री युनिव्हर्सिटी' उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

IIT Baba Abhay Singh Marriage: महाकुंभवेळी सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला 'आयआयटी बाबा'ने गुपचूप लग्न उरकले आहे. पत्नीला घेऊन घरच्यांना सरप्राईज देण्यासाठी अभय सिंह  हरियाणातील झाझरमध्ये पोहोचले. आयआयटीचे शिक्षण घेतलेला, सर्व सुखाचा त्याग करून संन्याशी झालेल्या आपल्या मुलाला पत्नीसोबत पाहून घरचे देखील शॉक झाले आहेत.

प्रयागराज महाकुंभमध्ये आपल्या उच्चशिक्षित पार्श्वभूमीमुळे आणि साधू वेशभूषेमुळे प्रकाशझोतात आलेले 'IIT बाबा' ऊर्फ अभय सिंह सोमवारी आपल्या पत्नीसह आपल्या मूळ गावी, झाझरमध्ये पोहोचले. लग्नानंतर ते पहिल्यांदाच झाझरमध्ये आले असून, बँक खात्याचे KYC अपडेट करण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय गाठले होते. यावेळी त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

अभय सिंह यांनी झाझर तहसील परिसरातील त्यांचे वडील जे पेशाने वकील आहेत यांच्या चेंबरमध्ये काही वेळ थांबले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रीतिका देखील होती. प्रीतिका या मूळच्या बेंगळुरूच्या असून, त्यादेखील अभय सिंह यांच्या आध्यात्मिक कार्यात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. 

लग्नानंतरचा प्रवास आणि कौटुंबिक भूमिकाअभय सिंह यांनी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे प्रीतिका यांच्याशी विवाह केला आणि १९ फेब्रुवारी रोजी कोर्ट मॅरेज देखील केले. सध्या हे दाम्पत्य हिमाचलमध्ये वास्तव्यास आहे. कुटुंबाविषयी बोलताना अभय सिंह म्हणाले की, "मोठ्या कुटुंबासाठी (समाजासाठी) छोट्या कुटुंबाचा त्याग करावा लागतो, तरीही मी माझ्या माता-पित्यांची भेट नक्कीच घेईन."

कोण आहेत अभय सिंह?IIT कानपूरसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर अभय सिंह यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. महाकुंभमध्ये त्यांच्या स्पष्ट विचारांमुळे आणि आगळ्यावेगळ्या जीवनशैलीमुळे त्यांची देशभरात चर्चा झाली होती. आता गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतरही त्यांची आध्यात्मिक आणि शैक्षणिक यात्रा सुरूच आहे.

टॅग्स :Prayagrajप्रयागराजmarriageलग्नHaryanaहरयाणा