शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 19:06 IST

Government Jobs: इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने आईटीएस पदांसाठी भरतीची घोषणा केली.

अभियांत्रिकी पदवीधरांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने आईटीएस पदांसाठी भरतीची घोषणा केली. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत एकूण ४९ रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०२५ निश्चित करण्यात आली. यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पात्रताया पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजेंस या विषयात अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवार २१ ते ३० वयोगतील असावे.

निवड प्रक्रियाउमेदवारांची निवड २०२५ च्या गेट स्कोअरच्या आधारे केली जाईल. शॉर्टलिस्टिंगनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. निवड प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित ठेवण्यासाठी आयएचएमसीएल विविध स्तरांवर पडताळणी करेल.

१ लाखांहून अधिक पगारया पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना ई-१ ग्रेड अंतर्गत ४० हजार ते १ लाख ४०,००० रुपयांपर्यंत वेतन मिळेल. सुरुवातीचा मासिक पगार सुमारे ८४,००० रुपये असू शकतो, ज्यामध्ये महागाई भत्ता, एचआरए आणि इतर फायदे समाविष्ट असतील. निवड झालेल्या उमेदवाराचा वार्षिक सीटीसी ११ लाखापर्यंत पोहोचू शकते.

अर्ज  प्रक्रिया- सर्वप्रथम उमेदवारांनी आयएचएमसीएल अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.- त्यानंतर आयएचएमसीएल भरती २०२५ या पर्यायावर क्लिक करावे.- पुढे आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावीत.- अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंटआऊट काढून घ्या.

टॅग्स :jobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरी