शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पश्चिम बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली आलीच पाहिजे; ममता बॅनर्जी यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 4:15 PM

गेल्या काही दिवसांपासून कोलकातामध्ये डॉक्टरांचा संप सुरु आहे.

कोलकाता : डॉक्टरांच्या संपामुळे घेरल्या गेलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांवर हल्ला चढविताना बंगाली कार्ड उघडले आहे. बाहेरच्या लोकांवरून भाजपवर नेम दरत त्यांनी जर बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली बोलता आलीच पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. तसेच अशा गुन्हेगारांना राज्यात थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर फिरतात, असेही ममता म्हणाल्या. 

गेल्या काही दिवसांपासून कोलकातामध्ये डॉक्टरांचा संप सुरु आहे. डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभुमीवर देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यावरून ममता बॅनर्जी लक्ष्य झाल्या आहेत. यामुळे ममता यांनी भाषिक मुद्दा उपस्थित करत बंगालला गुजरात बनू देणार नसल्याचे सांगितले. 

उत्तर परगना जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करताना ममता यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आपल्याला बंगाली भाषेला पुढे आणले पाहिजे. जेव्हा मी बिहार, उत्तर प्रदेश किंवा पंजाबमध्ये जाते तेव्हा तेथील भाषा बोलते. जर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये राहत असाल तर तुम्हाला बंगाली भाषा आलीच पाहिजे. अशा गुन्हेगारांना राज्यात थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर इकडे तिकडे फिरतात, असे ममता म्हणाला. 

डॉक्टरांना भाजपा आणि सीपीएम भडकवत असून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचे काम करत आहे, असा आरोप ममता यांनी केला. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी यावर प्रतिक्रिया देताना ममता या आरोग्य मंत्री आहेत. त्यांच्या अहंकारमुळे गेल्या चार दिवसांत किती जणांनी मृत्यूच्या दारात जाण्याचा अनुभव घेतला असेल, काही तरी लाज बाळगा, असे ट्विट केले आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल