शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाउडस्पीकर बंदी घालायची असेल तर सर्व धार्मिक स्थळांवर सुद्धा घालावी लागेल - योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 22:01 IST

कावड यात्रेदरम्यान लावण्यात येणा-या लाउडस्पीकरवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लाउडस्पीकर बंदी घालायचीच असेल तर सर्व धार्मिक स्थळांवर सुद्धा घालावी लागेल, असे म्हटले आहे. 

लखनऊ, दि. 17 -  कावड यात्रेदरम्यान लावण्यात येणा-या लाउडस्पीकरवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लाउडस्पीकर बंदी घालायचीच असेल तर सर्व धार्मिक स्थळांवर सुद्धा घालावी लागेल, असे म्हटले आहे.मोठ्या थाटामाटात सुरु झालेली कावड यात्रा संपली असून या कावड यात्रेदरम्यान लाउडस्पीकर लावण्यात आले होते. या लाउडस्पीकरवरुन अनेक तक्ररी दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री एका कार्यक्रमात लाउडस्पीकर बंदी बाबत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मला आश्चर्य वाटते. जेव्हा कावड यात्रेत असे सांगितले की डीजे, माईकचा वापर केला जाऊ नये आणि गाणी लावली जाऊ नयेत. माझा सवाल असा आहे, गाणी लावली नाहीत, तर ती कावड यात्रा की प्रेतयात्रा ?याचबरोबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, जर डमरु, ढोल, संगीत नसेल तर कावड यात्रा कशी होईल. मी याआधीही म्हटले होते, कावड यात्रेत अशाप्रकारची कोणतीही बंदी राहणार नाही. गाजियाबादपासून हरिद्वारपर्यंत जवळपास चार कोटी कावड यात्रेकरु होते. मात्र यामधून लाउडस्पीकर बंदीची एकही तक्रार आली नाही. मात्र, तुम्ही  भाविकांच्या भावना दुखावल्या, तर याचा परिणाम होईल. तसेच, मुख्यमंत्री म्हणाले, जर लाउडस्पीकरवर बंदी घालायची असेल तर सर्व धार्मिक स्थळांवर घालावी लागेल आणि असे शक्य नसेल तर कावड यात्रा अशीच सुरु राहील.