शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत चांगले गुण हवे असल्यास शिवलिंग बनवा, मुस्लिम विद्यार्थिनींचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 13:59 IST

मध्य प्रदेशातील भोपाळ येथील सरकारी शाळेत एका वर्कशॉपमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थिनींना मातीचे शिवलिंग तयार करण्यास सांगितले गेले. मात्र, यास मुस्लिम विद्यार्थिनींनी विरोध दर्शवला.

भोपाळ, दि. 2 - मध्य प्रदेशातील भोपाळ येथील सरकारी शाळेत एका वर्कशॉपचं आयोजन करण्यात आले होते. या वर्कशॉपमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थिनींना मातीचे शिवलिंग तयार करण्यास सांगितले गेले. चिंतेची बाब म्हणजे शाळेच्या  मुख्याध्यापिकांनी विद्यार्थिनींना सांगितले की, जर तुम्हाला परीक्षेत चांगले गुण हवे असतील तर या वर्कशॉपमध्ये तुम्हाला सहभाग नोंदवावा लागेल. 

यावेळी जवळपास 100 मुस्लिम विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिकांचे म्हणणे फेटाळून लावत वर्कशॉपमध्ये सहभाग घेण्यास विरोध दर्शवला. ''द क्विंट''नं दिलेल्या बातमीनुसार, शिवलिंग बनवण्यास नकार दिल्यानंतर एका वर्गात बंद करण्यात आल्याचा आरोप या मुस्लिम विद्यार्थिनींनी केला आहे. काही वेळानंतर मुलींना घरी जाण्यास सांगण्यात आले. भोपाळमधील कमला नेहरू गर्ल्स हायर सेकंडरी स्कूलमधील ही घटना आहे. ही शाळा भोपाळमधील टी.टी. नगर परिसरात आहे. दरम्यान, हे वर्कशॉप शाळेतील काही अधिका-यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे शाळेच्या परिसरात अशा प्रकारे सुरू असलेला धार्मिक कार्यक्रम रोखण्याचाही  प्रयत्न करण्यात आला नाही.

या शाळेमध्ये वेगवेगळ्या धर्मांमधील मुली शिकण्यासाठी येतात.  शाळेच्या मुख्याध्यापिका निशा कामरानी यांनी विद्यार्थिनींना सांगितले की, जर आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा आहे तर पूर्ण एकाग्रतेने शिवलिंग बनवा. या दरम्यान, शाळेत एक पुजारीदेखील हजर होते. त्यांनी माइकवरुन संस्कृत भाषेतील मंत्र सांगत यज्ञ केले. 

जेव्हा मुस्लिम विद्यार्थिनींनी या वर्कशॉपमध्ये सहभाग घेण्यास नकार दिला त्यावेळी त्यांना एक वर्गात बसण्यास सांगितले गेले व कथित स्वरुपात शाळेतील अधिका-यांना त्यांना बंद केले. मुलींना या कार्यक्रमास विरोध केल्यानंतर त्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले, अशीही माहिती समोर आली आहे.