शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

मोटार वाहन कायद्यातील दंड जास्त वाटतोय?; मग 'हे' आकडे पाहून हादरालच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 14:56 IST

बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी वाहतुकीचे नियम तयार करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी वाहतुकीचे नियम तयार करण्यात आले आहेत. भारतात 1 सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. नवीन कायद्यातंर्गत वाहतुकीचे नियम मोडल्यास जवळपास 30 पटीने अधिक दंड वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कार, बाईक चालविताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनधारकांना दंड भरावा लागतो. 

भारतात वाहतुकीचे नियम तोडल्यास असणारा दंड अधिक असल्याचं येथील लोकांना वाटतं. मात्र इतर देशात वाहतुकीचे नियम तोडल्यास असणारी रक्कम ही जास्त आहे. भारताप्रमाणे इतरही देशात वाहतुकीचे नियम तयार करण्यात आले आहेत. सुरक्षित वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी दंडाची रक्कम ठरवण्यात आलेली असते. विविध देशात ही रक्कम वेगवेगळी आहे. हाँगकाँग, अमेरिका, जर्मनी, जपान, सिंगापूरमध्ये नियम तोडल्यास असणारी दंडांची रक्कम ही लाखांमध्ये आहे. 

जपानमध्ये दारुच्या नशेत गाडी चालविली तर 6, 77,115 रुपये दंड भरावा लागतो. तर अमेरिकेत 1,79,905 रुपये, जर्मनीत 1,18,359 रुपये, सिंगापूरमध्ये 2,58,771 रुपये आणि हाँगकाँगमध्ये  2,29,376 रुपये दंड भरावा लागतो. सिग्नल तोडल्यास सिंगापूरमध्ये 25,877 रुपये, भारतात 5000 रुपये, हाँगकाँगमध्ये 5,505 रुपये, जर्मनीत 7,101 रुपये, जपानमध्ये 6,094 रुपये आणि अमेरिकेत 3,598 रुपये दंड आहे. 

भारतात जर तुम्ही विना परवाना गाडी चालवत असाल तर 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. त्याचसोबत दारुच्या नशेत गाडी चालविली तर 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत. तर हे नियम मोडल्यामुळे तुमचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला जेलची हवा खावी लागणार आहे. जर अल्पवयीन मुलाने गाडी चालवून अपघात केल्यास, त्याच्या पालकांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, तसेच त्या वाहनाची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. 

भारतात वाहतुकीचे नियम मोडल्यास 15 हजारापर्यंत दंड तर 2 वर्षाची शिक्षा   

सामान्य दंडाची रक्कम - पूर्वी 100 रुपयांवरून आता 500 रुपये 

हेल्मेट न घालता गाडी चालविणे - पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 1 हजार रुपये दंड आणि 3 महिने परवाना निलंबित 

विना परवाना गाडी चालविणे - पूर्वी 500 रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये 

दुचाकीवर तीन जणांनी प्रवास केला तर पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 2 हजार रुपये दंड आणि 3 महिने वाहन परवाना निलंबित करण्याची शिक्षा 

सीट बेल्ट न घालता गाडी चालविणे - पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 1 हजार रुपये 

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे - पूर्वी 1 हजार रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये 

भरधाव वेगाने वाहन चालविल्यास - पूर्वी 400 रुपये दंड होता तर आता पहिल्यांदा पकडल्यास हलक्या वाहनांवर 1 ते 2 हजार रुपये दंड तर जड वाहनांना 2 ते 4 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, आणि दुसऱ्यांदा पकडल्यास परवाना जप्त करण्यात येणार आहे. 

रॅश ड्रायव्हिंग - पहिल्यांदा 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत जेल आणि 1 हजार ते 5 हजार दंड तर दुसऱ्यांदा 2 वर्षापर्यंत जेल आणि 10 हजार रुपये दंड

 दारू पिऊन गाडी चालविल्यास - पहिल्यांदा 6 महिने जेल आणि 10 हजार रुपये दंड तर दुसऱ्यांदा 2 वर्ष जेल आणि 15 हजार रुपये दंड  

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीIndiaभारतJapanजपानsingaporeसिंगापूरAmericaअमेरिका