शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

"जिवंत राहिलात तर सणवार साजरे करता येतील" हायकोर्टाने छटपूजेची परवानगी मागणाऱ्यांना फटकारले

By बाळकृष्ण परब | Published: November 18, 2020 3:40 PM

corona virus News : कोरोनाचा फैलाव वाढत असताना छठपूजेसाठी परवानगी मागणाऱ्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.

ठळक मुद्देछठपूजेच्या सामूहिक आयोजनामुळे कोरोनाचा फैलाव वाढू शकतो याचिकाकर्त्यांना दिल्लीतील परिस्थितीची माहिती नाही अशा परिस्थितीत गर्दी एकत्रित करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असताना छठपूजेसाठी परवानगी मागणाऱ्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. दिल्लीत छठपूजेच्या सार्वजनिक आयोजनांवर निर्बंध घालण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाला कोर्टाने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे छठपूजेच्या सार्वजनिक आयोजनावर बंदी घातल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या केजरीवाल सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.छठपूजेच्या सार्वजनिक आयोजनावर दिल्ली सरकारने घातलेली बंदी उठवून छठपूजेला परवानगी द्यावी, अशी मागणी करत दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र छठपूजेच्या सामूहिक आयोजनामुळे कोरोनाचा फैलाव वाढू शकतो, असे सांगत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. तसेच जिवंत राहिलात तर सणवार साजरे करू शकाल. याचिकाकर्त्यांना दिल्लीतील परिस्थितीची माहिती नाही आहे. अशा परिस्थितीत गर्दी एकत्रित करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, अशा शब्दांत याचिकाकर्त्यांना हायकोर्टाने सुनावले.दिल्लीत कोरोनामुळे बिकट परिस्थिती ओढवली आहेत. वाढती रुग्णसंख्या आणि मृत्युदर चिंताजनक बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्ली सरकारला काही भागात स्थानिक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची परवानगी दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी नायब राज्यपालांच्या माध्यमातून मंगळवारी केंद्र सरकारकडे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात काही व्यवहारांवर निर्बंध लावण्याची परवानगी मागितली होती.दरम्यान, दिल्लीतील परिस्थितीबाबत नीती आयोगानेही चिंता व्यक्त केली आहे. तसेच दिल्लीती परिस्थिती पुढच्या काही आठवड्यात अजूनच बिघडू शकतात, अशी भीतीही नीती आयोगाने व्यक्त केली आहे. दिल्लीमध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे कोरोनाबाधितांची संख्या ३६१ वरून वाढून ५०० पर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. सणांच्या काळात सर्व नियमांचे केलेले उल्लंघन हे यामागचे कारण असल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय