शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गाईंची तस्करी कराल तर जमावाच्या मारहाणीत मराल, भाजपा आमदाराची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 11:56 IST

वादग्रस्त विधानांमुळे नेहमची चर्चेत असणारे भाजपाचे आमदार ज्ञानदेव अहुजा त्यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत

ठळक मुद्दे वादग्रस्त विधानांमुळे नेहमची चर्चेत असणारे भाजपाचे आमदार ज्ञानदेव अहुजा त्यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.ज्ञानदेव अहुजा यांनी एक वादग्रस्त विधान करून नवा वाद ओढवून घेतला आहे.

जयपूर- वादग्रस्त विधानांमुळे नेहमची चर्चेत असणारे राजस्थानमधील भाजपाचे आमदार ज्ञानदेव अहुजा त्यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ज्ञानदेव अहुजा यांनी एक वादग्रस्त विधान करून नवा वाद ओढवून घेतला आहे. गायींची तस्करी आणि हत्या करणाऱ्यांना लोकांचा मार खाऊन जीव गमवावा लागेल, असं ज्ञानदेव अहुजा यांनी म्हटलं आहे. अलवार जिल्ह्यात गायींची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. झाकीर नावाचा एक व्यक्ती ट्रकमधून अवैधपणे गायींना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा आरोप आहे. अलवरच्या खिलोरा गावाजवळ स्थानिकांनी झाकीरचा ट्रक पकडला. त्यामध्ये आठ गुरं होती. झाकीर गायींची तस्करी करत असल्याच्या संशयावरून जमावाने त्याला बेदम मारहाणही केली. पण, पोलिसांनी वेळीच त्याला स्थानिकांच्या तावडीतून सोडवून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या घटनेला उद्देशून ज्ञानदेव अहुजा यांनी हे वादग्रस्त विधान केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

गायींची तस्करी आणि हत्या करणाऱ्यांना अशाचप्रकारे जमावाचा मार खाऊन मरावं लागेल, हे माझं स्पष्ट मत आहे. पण, त्यानंतर अहुजा यांनी सारवासारव करताना झाकीरला स्थानिकांकडून मारहाण झाल्याचं नाकारलं. स्थानिक लोक झाकीरचा ट्रक अडवण्याचा प्रयत्न करत होते. पण, पळून जाण्याच्या नादात त्याचा ट्रक उलटला. यावेळीच त्याला दुखापत झाली. पण, आता तो लोकांना आपल्याला मारल्याचा खोटा दावा करत आहे. मी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानुसार लोकांनी झाकीरला मारलंच नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे, असा दावा ज्ञानदेव अहुजा यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या लोकांवर गुन्हे दाखल केले असून चौकशी सुरू आहे.