शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दीर्घकाळ खाेकला राहिला, तर क्षयराेग तपासणी करा; सुधारित वैद्यकीय मार्गदर्शक सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 10:32 IST

साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी पाच दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी खूप ताप, खाेकला किंवा श्वास घेण्यास त्रास हाेत असेल तरच वैद्यकीय मदत घ्यावी. अशा रुग्णांनी घरीच विलगीकरणात राहावे व इतर नियमावलींचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने प्राैढ काेराेना रुग्णांचे उपचार आणि व्यवस्थापनासाठी सुधारित वैद्यकीय मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रुग्णांचा खाेकला दाेन-तीन आठवड्यांहून जास्त काळ कायम राहिल्यास क्षयराेग व इतर आजारांची तपासणी करून घ्यावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यातून देण्यात आली आहे. साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी पाच दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी खूप ताप, खाेकला किंवा श्वास घेण्यास त्रास हाेत असेल तरच वैद्यकीय मदत घ्यावी. अशा रुग्णांनी घरीच विलगीकरणात राहावे व इतर नियमावलींचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. ऑक्सिजनची पातळी ९० ते ९३ टक्के राहिल्यास अशा रुग्णांना काेविड उपचारांसाठी दाखल करण्यात यावे. ९० टक्क्यांहून कमी ऑक्सिजनची पातळी असलेल्या रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. ५० लाखांहून अधिक जणांना दक्षता मात्रासुमारे ५० लाखांहून अधिक आराेग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लसीची दक्षता मात्रा घेतली. केंद्रीय आराेग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली. देशात एकूण १५८ काेटींहून अधिक डाेस देण्यात आले आहेत. दक्षता मात्रा घेण्यासाठी जे पात्र आहेत, त्यांनी लवकरात लवकर ती घ्यावी, असे आवाहनही मांडविया यांनी केले.