शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेला मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 16:21 IST

निवडणूक आयोगाने या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीदही सर्व बँकांना दिली आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान न करणे महागात पडणार आहे. निवडणूक आयोगाने मतदान न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार, मतदान न करणाऱ्या व्यक्तींची ओळख आधारकार्डद्वारे होणार आहे. तर, या कार्डद्वारे लिंक असलेल्या बँकेतून 350 रुपये वजा होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यांसदर्भात सर्वच सरकारी बँकांना आदेश दिले आहेत. ( बुरा न मानो होली है )

निवडणूक आयोगाने या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीदही सर्व बँकांना दिली आहे. आयोगच्या प्रवक्त्यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. देशातील सर्वच मतदारांना लक्षात घेऊनच मतदान प्रक्रियेची तयारी करण्यात येते. त्यामुळे जे मतदार मतदानाचा हक्क बजावत नाहीत, त्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने केलेला खर्च वायपट जातो. प्रत्येकी एका मतदानासाठी आयोगाला 350 रुपये खर्च येतो. म्हणूनच, जो मतदार मतदान करणार नाही, त्या मतदाराकडून निवडणूक आयोग 350 रुपये वसुल करणार आहे. 

विशेष म्हणजे ज्या मतदारांचे बँक अकाऊंट नसेल, त्या मतदारांकडून मोबाईल फोनचे रिचार्ज करताना हे 350 रुपये वसुल केले जाणार आहेत. त्यासाठी कमीत-कमी 350 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. त्यापेक्षा कमी रकमेचा रिचार्ज फोनवरुन होणार नाही. विशेष म्हणजे, आयोगाच्या या आदेशाविरुद्ध कुणीही न्यायालयात दाद मागू नये, यासाठी अगोदरच आयोगाने न्यायालयाकडून या आदेशाची परवानगी घेतली आहे. दरम्यान, देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 7 टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. तर 23 मे रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार सध्या देशात आदर्श आचासंहित लागू करण्यात आली आहे. ( बुरा न मानो होली है, आज होळीनिमित्त ही बातमी प्रसिद्ध करण्यात येत असून निवडणूक आयोगाने अशी शक्कल लढवायला हवी )

टॅग्स :VotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbankबँकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग