शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"बेळगावात येण्याचं धाडस कराल तर.…’’ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 15:55 IST

Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगाव दौऱ्यावर जाण्याचं नियोजन करत असलेल्या महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इशारा दिला आहे.

 बंगळुरू - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पेटला असून, त्या मुद्द्यावरून दोन्ही राज्यातील राज्य सरकराने आणि नेते आमने-सामने आले आहेत. दरम्यान, बेळगाव दौऱ्यावर जाण्याचं नियोजन करत असलेल्या महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इशारा दिला आहे.

बेळगावमध्ये येण्याचं धाडस केल्यास कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असा इशारा बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना दिला आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोम्मई यांनी सांगितले की, या प्रकरणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच त्यांच्या मंत्र्यांना बेळगावमध्ये न पाठवण्याचं आवाहन करणार आहे. या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच सीमाभागातील अधिकाऱ्यांनाही कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे बोम्मई यांनी सांगितले. 

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादादरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे ६ डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे जाणार होते. यावेळी ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना भेटणार होते. तसेच सीमावादावर त्यांच्यासोबत चर्चा करणार होते. त्याआधी या दोन्ही मंत्र्यांचा दौरा ३ डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आला होता.

दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबतची फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणले की,  मंत्र्यांचा बेळगाव दौरा हा महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता. त्यासाठी एका कार्यक्रमाला मंत्री जाणार होते. त्यात महाराष्ट्राचं काही म्हणणं आहे. कर्नाटकचं काही म्हणणं आहे. मंत्र्यांनी ठरवलं तर ते जाऊ शकतात. त्यांना जाण्यापासून कुणी रोखू शकणार नाही. मात्र महापरिनिर्वाण दिनी असा वाद तयार करायचा का हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे यासंदर्भात काही ना काही विचार आम्ही करतोय. माननीय मुख्यमंत्री आम्हाला याबाबत अंतिम निर्णय देतील. महापरिनिर्वाण दिन आमच्यासाठी मोठा दिवस आहे. त्यादिवशी एखादं आंदोलन व्हावं. कुठलीही चुकीची घटना व्हावी हे योग्य नाही. भविष्यात आपल्याला तिथे जाता येईल. तिथे जाण्यापासून कुणी रोखू शकणार नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारKarnatakकर्नाटकPoliticsराजकारण