शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 06:12 IST

राहुल यांचे आश्वासन; मोदींसारखा मी खोटारडा नाही

थ्रिसूर : लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात येईल असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे मी खोटी आश्वासने देत नाही असाही टोला त्यांनी लगावला.केरळमधील त्रिप्रयार येथे अखिल भारतीय मच्छीमार काँग्रेसने आयोजिलेल्या राष्ट्रीय मच्छीमार संसद या कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधी यांनी सांगितले की, तुम्ही माझी भाषणे बारकाईने ऐकलीत तर लक्षात येईल की मी जे सांगतो ते करतो. एखादा निर्णय घेतला तर तो अंमलात आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. काँग्रेस पक्ष नेहमीच आपल्या शब्दांवर ठाम राहतो.राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील चेन्नई येथील स्टेला मॅरिस महिला महाविद्यालयामध्ये बुधवारी बोलताना असे आश्वासन दिले होते की, आम्ही सत्तेवर आल्यास संसदेत व विधानसभांत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यात येईलच, पण सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आक्षण ठेवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाईल. विविध प्रांतातील दुर्लक्षित घटकांच्या मागण्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे राहुल गांधी लोकसभा निवडणुकांतील प्रचारसभांमध्ये सध्या विविध आश्वासनांची पेरणी करत आहेत.उद्योगपतींकडेच लक्षराहुल गांधी मच्छीमारांच्या कार्यक्रमात म्हणाले की, शेतकरी, मच्छीमार, लघुउद्योजक यांच्याकडे लक्ष न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त अनिल अंबानी, नीरव मोदीसारख्या बड्या उद्योगपतींच्या मागण्या मान्य करीत आहेत. या उद्योगपतींनी मागण्या केल्या की पंतप्रधान १० सेकंदांत पूर्ण करतात, असेही ते उपरोधिक शैलीत म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधी