शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

अल्प अमली पदार्थ बाळगले, तर थेट तुरुंगात रवानगी नको; केंद्रीय सामाजिक न्याय खात्याची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 07:55 IST

Central Social Justice Department : सामाजिक न्याय खात्याने म्हटले आहे की, अमली पदार्थांच्या व्यसनाधीनांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. वैयक्तिक वापरासाठी अल्प प्रमाणात अमली पदार्थ बाळगणाऱ्यांनाही थेट तुरुंगात धाडण्यात येते. अ

नवी दिल्ली : वैयक्तिक वापरासाठी अल्प प्रमाणात अमली पदार्थ बाळगणाऱ्यांना, व्यसनाधीनांना थेट तुुरुंगात धाडू नका, त्यांना व्यसनमुक्त करण्याचा, तसेच पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करावा. तशी सुधारणा अमली पदार्थविरोधी कायद्यात करण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय खात्याने काही दिवसांपूर्वी महसूल खात्याला केली आहे.

सामाजिक न्याय खात्याने म्हटले आहे की, अमली पदार्थांच्या व्यसनाधीनांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. वैयक्तिक वापरासाठी अल्प प्रमाणात अमली पदार्थ बाळगणाऱ्यांनाही थेट तुरुंगात धाडण्यात येते. अमली पदार्थविरोधी कायद्यामध्ये आणखी कोणते फेरबदल होणे अपेक्षित आहे याबद्दल महसूल खात्याने केंद्राच्या काही खात्यांकडून सूचना मागविल्या होत्या.

केंद्रीय सामाजिक न्याय खात्याने म्हटले आहे की, अमली पदार्थांच्या वापराबद्दल व्यसनाधीनांना तुरुंगात टाकले जाते. त्यामुळे या व्यसनाधीनांची समस्या कमी न होता वाढतच जाते अशी इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाची (आयएनसीबी) भूमिका आहे. त्याच्याशी सुसंगत भूमिका सामाजिक न्याय खात्याने घेतली आहे. अमली पदार्थ प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला थेट तुरुंगात धाडण्यात आले आहे. तेव्हापासून हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

भारतामध्ये अमली पदार्थ बाळगणे किंवा त्यांचे व्यसन करणे हा फौजदारी गुन्हा आहे. जर व्यसनाधीन स्वत:वर उपचार करून घेण्यासाठी व पुनर्वसनासाठी राजी असतील तर त्यांच्यावर खटला दाखल केला जात नाही किंवा तो अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात दोषी जरी आढळला तरी त्याला तुरुंगवासाची शिक्षा केली जात नाही. मात्र, वैयक्तिक वापरासाठी अल्प प्रमाणात अमली पदार्थ बाळगणाऱ्यांना किंवा पहिल्यांदाच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याची, त्यांना दिलासा देण्याची तरतूद अमली पदार्थविरोधी कायद्यामध्ये नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय खात्याने नवी सूचना केली आहे.

महिनाभर करा उपचार, समुपदेशन

-    कोणत्याही अमली पदार्थाचे व्यसन करणाऱ्यांना अमली पदार्थविरोधी कायद्याच्या कलम २७ मधील तरतुदीनुसार, एक वर्षापर्यंत कारावास व २० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद आहे. -    खूप आधीपासून व्यसनाधीन असलेले, नव्याने अमली पदार्थांचे व्यसन लागलेले असा भेद ही शिक्षा देताना केला जात नाही. त्यामुळे व्यसनाधीनांना तुरुंगात धाडण्याऐवजी सरकारी पुनर्वसन, तसेच सपुदेशन केंद्रांमध्ये महिनाभर उपचार केले जावेत. -    तसा बदल अमली पदार्थविरोधी कायद्यामध्ये करण्यात यावा अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय खात्याने महसूल खात्याला केली आहे. 

टॅग्स :jailतुरुंगAryan Khanआर्यन खान