शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 09:58 IST

ईदच्या वेळी रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून मला रोखता येत नसेल तर, पोलीस स्थानकातही जन्माष्टमी साजरी करण्यापासून मी कोणाला रोखू शकत नाही.

ठळक मुद्दे यदुवंशी म्हणवणा-यांनी पोलीस स्थानकात जन्माष्टमी साजरी करण्यावर बंदी घातली होती.कुठल्याही धर्मस्थळामधून माईकाचा आवाज बाहेर येणार नाही हे सुनिश्चित करता येईल का?

लखनऊ, दि. 17 - ईदच्या वेळी रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून मला रोखता येत नसेल तर, पोलीस स्थानकातही जन्माष्टमी साजरी करण्यापासून मी कोणाला रोखू शकत नाही असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. आधीच्या समाजवादी पार्टीच्या सरकारला टोला लगावताना स्वत:ला यदुवंशी म्हणवणा-यांनी पोलीस स्थानकात जन्माष्टमी साजरी करण्यावर बंदी घातली होती असे ते म्हणाले. योगींच्या या विधानावरुन नवीन वाद होण्याची शक्यता आहे.

प्रेरणा जनसंचारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसांबळेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या भाषणात आदित्यनाथांनी कावड यात्रेचाही संदर्भ दिला. अधिका-यांनी जेव्हा मला कावड यात्रेमध्ये माईक, डीजे आणि म्युझिक सिस्टीम वापरण्याला मनाई केल्याचे सांगितले. त्यावेळी मी त्यांना सर्वच ठिकाणी माईकवर बंदी घालता येऊ शकते का?  कुठल्याही धर्मस्थळामधून माईकाचा आवाज बाहेर येणार नाही हे सुनिश्चित करता येईल का? असा प्रतिप्रश्न केला. जर अशा प्रकारे आपल्याला बंदीची अंमलबजावणी करता येत नसेल तर, यात्रा नेहमीसारखी चालू राहिल असे मी त्यांना सांगितले. 

आणखी वाचा राजौरीजवळच्या नियंत्रण रेषेवर जम्मू-काश्मीर सरकार बनवतंय 100 बंकर्समराठवाड्यातील २५०० कुटुंबांचे स्थलांतर!

मी अधिका-यांना म्हटले की, कावड यात्रा आहे की, शव यात्रा ? कावड यात्रेत बाजा, डमरु, ढोल, चिमटे वाजणार नाहीत, लोक गाणार, नाचणार नसतील तर, ती कावड यात्रा कसली ?देशात प्रत्येकाला आपले सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही ख्रिसमसही साजरा करा असे योगी म्हणाले. भारतात कधीही कोणाला थांबवलेले  नाही. कायद्याचे पालन करुन नमाज पठण करा. कायद्याचे उल्लंघन होणार असेल तर संघर्ष होणारच असे योगी म्हणाले. 

शिवाजी महाराज खरे हिरो, बाबर, अकबर घुसखोर - योगी आदित्यनाथमुघल शासक बाबर आणि अकबर घुसखोर होते. त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही. हे लोकांनी मान्य केल्यास देशातील समस्या सुटण्यास सुरुवात होईल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका कार्यक्रमात म्हणाले.  ज्या राज्याकडे, समाजाकडे आपल्या इतिहासाचे संवर्धन करण्यास वेळ नाही तो प्रदेश आपल्या भूगोलाचे संरक्षण करु शकत नाही असे आदित्यनाथ म्हणाले. 

महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग हे आपल्या देशाचे खरे हिरो आहेत. त्यांचा सन्मान झाला पाहिजे असे आदित्यनाथ म्हणाले.