माफी मागितल्यास वादावर पडदा; महामंत्री वैष्णवदास दिगंबर आखाडा बैठक : ११ सदस्य समिती स्थापना
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
पंचवटी : चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून वाद होऊन श्री महंतांचा अपमान केला आणि त्यातूनच बहिष्कृत केलेल्या तीन खालशांनी माफी मागितल्यास वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. आखाड्याच्या खालशात सुरू झालेले वाद मिटविण्यासाठी खालशातीलच अकरा सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती दिगंबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास यांनी दिली.
माफी मागितल्यास वादावर पडदा; महामंत्री वैष्णवदास दिगंबर आखाडा बैठक : ११ सदस्य समिती स्थापना
पंचवटी : चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून वाद होऊन श्री महंतांचा अपमान केला आणि त्यातूनच बहिष्कृत केलेल्या तीन खालशांनी माफी मागितल्यास वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. आखाड्याच्या खालशात सुरू झालेले वाद मिटविण्यासाठी खालशातीलच अकरा सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती दिगंबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास यांनी दिली.तीन दिवसांपूर्वीच दिगंबर आखाड्याने महात्यागी कॅम्पच्या सीतारामदास डाकोरचे माधवाचार्य आणि तेराभाई त्यागी खालशाचे बृजमोहनदास या तिघा खालशांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. या विषयावर चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी दिगंबर आखाड्यात खालशांची बैठक झाली. महंत कृष्णदास महाराज, महंत रामकिशोरदासशास्त्री, महंत गंगादास, जगन्नाथ पुरी, महंत वैष्णवदास यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत खालशांचे वाद मिटविण्यासाठी ११ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीबरोबर बहिष्कृत खालशांचे महंत चर्चा करून काय निर्णय घ्यायचा प्रस्ताव ठेवतील तर समिती खालशांसमोर आखाड्याने मांडलेले प्रस्ताव मांडण्याचे काम करणार आहे.दिगंबर आखाड्यात झालेल्या बैठकीत केवळ बहिष्कृत केलेल्या खालशांवरच चर्चा करण्यात आली. तर आखाडा परिषद अध्यक्ष पदावरच्या चर्चेस साधू-महंतांनी पूर्णविराम दिला. चतु:संप्रदायच्या ध्वजारोहण सोहळ्यात ध्वजा कोणत्या रंगाची फडकवायची यावरून वाद झाला होता व त्यातून बहिष्कृत केलेल्या खालशांच्या महंतांचा वाद मिटविण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीत समावेश केलेला नाही. विना मतलब वाद करण्यात अर्थ नाही, आम्ही स्नानासाठी आलो आहोत असे म्हणून वाद मिटविण्यास सुरुवात झाली आहे. निर्वाणी, निमार्ेही आखाड्याशी काही घेणे नाही, असेही बैठकीला उपस्थित असलेल्या साधू-महंतांनी सांगितले. (वार्ताहर)बॉक्सपरंपरेनुसार चतु:संप्रदाय ध्वज लालज्या चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून वाद झाला तो ध्वज लाल रंगाचाच असल्याची कबुली जगन्नाथपुरीचे महंत गंगादास महाराज यांनी दिली आहे. केवळ काही साधू-महंतांनी भ्रम निर्माण केला आहे. बैठकीत योग्य ती चर्चा झाली असून त्यातूनच लवकर तोडगा निघण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.