शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असल्यास भन्साळींनी मोहम्मद पैगंबरांवर चित्रपट काढावा, गिरिराज सिंह यांचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 21:02 IST

पद्मावत चित्रपट सिनेमागृहात झळकल्यानंतरही करणी सेनेचा चित्रपटाला विरोध कायम आहे. अनेक सिनेमागृहांच्या बाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळही केली.

नवी दिल्ली- पद्मावत चित्रपट सिनेमागृहात झळकल्यानंतरही करणी सेनेचा चित्रपटाला विरोध कायम आहे. अनेक सिनेमागृहांच्या बाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळही केली. सिनेमाचा वाद शमेल असं वाटत असतानाच आता भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी त्या वादाला नव्यानं फोडणी दिली आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी थेट संजय लीला भन्साळींना आव्हान देऊन टाकलंय.हिंमत असल्यास संजय लीला भन्साळींनी मोहम्मद पैगंबरांवर चित्रपट काढावा. तसेच त्या चित्रपटात पैगंबरांचे चरित्र दाखवावे, असं गिरिराज सिंह म्हणाले आहे. मोहम्मद पैगंबरांवर चित्रपट काढून त्यांचे चरित्र दाखवण्याची कोणामध्ये हिंमत आहे का, असा सवालही त्यांनी नाव न घेता भन्साळींना विचारला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ज्यावेळी राजस्थानात पद्मावत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी भन्साळींनी ते का बंद केले नाही ? गांधीजींवर चित्रपट काढून त्यात त्यांना कथ्थक आणि भांगडा करताना दाखवलं तर मी माफ करणार नाही, असं म्हणत त्यांनी भन्साळींवर निशाणा साधला आहे.चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच करणी सेनेनं देशातल्या अनेक भागांत आंदोलनं करत जाळपोळ केली. आंदोलनकर्त्यांनी गुरुग्राममध्ये स्कूलबसवर हल्ला केला होता. चित्रपटाने आतापर्यंत 83 कोटींचा गल्ला जमवला असून, चित्रपट समीक्षकांच्या मते हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा व्यवसाय करेल. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी करणी सेनेनं केली होती. भन्साळींनी चित्रपटात इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या पद्धतीनं दाखवल्याचा करणी सेनेचा आरोप आहे.

टॅग्स :Padmavatपद्मावतKarni Senaकरणी सेना