शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

'अमेरिकेसोबत व्यापार करार केला तर मांसाहारी दूध येईल, मग उपवासाचे काय करायचे?', अखिलेश यादव यांनी टॅरिफवर स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:37 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल भारतावर २५ टक्के टॅरिफ लावणार असल्याचे जाहीर केले.

अमेरिकेने भारतावर २५% कर लादण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतीय मार्केटमध्ये गोंधळ उडाला आहे.  निफ्टी १७० पेक्षा जास्त अंकांनी घसरणीसह उघडला आणि सेन्सेक्स ६०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. कर जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या करवाढीवर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जर आपण अमेरिकेशी व्यापार करार केला तर मांसाहारी दूध भारतात येईल, तर उपवासाचे काय करणार?'यासह  त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

"ते काय बोलत आहेत याने काही फरक पडत नाही, आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, देशात महागाई वाढत आहे. रोजगार नाहीये, सरकार नोकऱ्या देत नाहीये. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची चर्चा होती, पण सरकार ते करू शकलेले नाही. शेतकऱ्यांना खते मिळत नाहीत",असंही अखिलेश यादव म्हणाले. 

प्रत्येक वर्षी लाखो लोक देश सोडतायत

"चीनसोबतची आपली व्यापार तूट किती आहे ते तुम्ही पाहता. तुम्ही इतर देशांशी हिशोब करत आहात. तुमच्याच लोकांचे जीवनमान चांगले नाही.  'दरवर्षी लाखो लोक भारत सोडून जात आहेत', असा दावाही यादव यांनी केला. जर अमेरिका हे म्हणत असेल तर ते काही आधारावर ते म्हणत असेल. सरकारने काहीतरी सांगायला हवे, ते ११ वर्षांपासून कोणत्या प्रकारची मैत्री निर्माण करत होते. कारण ११ वर्षांनंतर, आपण या वाईट दिवसांबद्दल आणि या सर्व गोष्टींबद्दल ऐकत आहोत, असंही अखिलेश यादव म्हणाले. 

तर नॉनव्हेजिटेरियन उपवास करतील

"जर आपण अमेरिकेसोबत फ्री ट्रेड केले तर नॉनव्हेज दूध भारतात येईल. आमचे मित्र उपवास करतात आणि उपवासामध्ये दूधापासून बनवलेले पदार्थ खाल्ले तर काय होईल.आपण कोणत्या क्षेत्रात फ्री ट्रेड करत आहोत, याबाबत आपल्याला विचार केला पाहिजे, असंही अखिलेश यादव म्हणाले.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प