शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

"गांधीजींच्या आर्थिक विचारांवर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसती"

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 27, 2020 14:21 IST

आजच्या कार्यक्रमात मोदींनी काही प्रसंग सांगितले, तसेच  महात्मा गांधी, भगत सिंग, लालबहादूर शस्त्री, जयप्रकाश नारायन आणि नानाजी देशमुख यांच्यासह शेती आणि शेतकरी या मुद्द्यांवरही भाष्य केले.

ठळक मुद्देगांधीजींच्या आर्थिक विचारांवर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसती - मोदीमोदी म्हणाले, देशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेलजोवर कोरोनावर औषध उपलब्ध होत नाही, तोवर काळजी घ्या - मोदी

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारतावर बोलताना महात्मा गांधींच्या आर्थिक विचारांवरही भाष्य केले. "गांधीजींच्या आर्थिक विचारांवर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसती," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

आजच्या कार्यक्रमात मोदींनी काही प्रसंग सांगितले, तसेच  महात्मा गांधी, भगत सिंग, लालबहादूर शस्त्री, जयप्रकाश नारायन आणि नानाजी देशमुख यांच्यासह शेती आणि शेतकरी या मुद्द्यांवरही भाष्य केले.

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

मोदी म्हणाले, २ ऑक्टोबर आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादाई दिवस आहे. हा दिवस महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. गांधीजींचे विचार आणि आदर्श आज पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक आहेत. गांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसती. कारण महात्मा गांधींच्या आर्थिक चिंतनात भारताच्या नसा-नसाचा विचार करण्यात आलेला होता. आपले प्रत्येक कार्यातून गरिबातील गरीब व्यक्तीचेही कल्ल्यान व्हायला हवे, असे महात्मा गांधींचे जिवन आपल्याला शिकवते. तसेच लाल बहादूर शास्त्रीजींचे जीवन आपल्या नम्रता आणि साधेपणाचा संदेश देते, असेही मोदी म्हणाले.

नवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

देशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल - मोदी म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली आहे. देशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल. मोदी म्हणाले, शेतकरी शक्तीशाली होणे आवश्यक आहे. तो संपन्न झाला तरच आत्मनिर्भर भारताचा पाया तयार होईल. शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल. एवढेच नाही, तर आज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, असेही मोदींनी यावेळी ठासून सांगितले.

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

जोवर कोरोनावर औषध उपलब्ध होत नाही, तोवर काळजी घ्या -कोरोनावर बोलताना, कोरोना काळात अधिक काळजी बाळगा, जोवर यावर औषध उपलब्ध होत नाही, तोवर कसल्याही प्रकारचा निष्काळजी करू नका. दोन मिटरचे अंतर कोरोना काळात एक आवश्यकता बनली आहे. मात्र, या संकटाच्या काळानेच कुटुंबातील सदस्यांना जोडण्याचे आणि जवळ आणण्याचेही काम केले आहे. आपल्याला नक्कीच जाणीव झाली असेल, की आपल्या पूर्वजांनी जे नियम तयार केले होते, ते आजही किती महत्वाचे आहेत आणि जेव्हा त्यांचे पालन होत नाही, तेव्हा काय होते, असेही मोदी म्हणाले.

EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानFarmerशेतकरीMahatma Gandhiमहात्मा गांधी