शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

भाजपा सत्तेत आल्यास हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर ठेवणार- टी. राजा सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 23:07 IST

वादग्रस्त विधानासाठी नेहमीच चर्चेत असणारे तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी हैदराबादचं नाव बदलणार असल्याचं सांगितलं आहे.

हैदराबाद- वादग्रस्त विधानासाठी नेहमीच चर्चेत असणारे तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी हैदराबादचं नाव बदलणार असल्याचं सांगितलं आहे. जर भाजपा पुन्हा सत्तेत आली, तर हैदराबादचं नाव बदलू, असंही टी. राजा सिंह म्हणाले आहेत. ते म्हणाले, भाजपाला तेलंगणामध्ये सत्ता मिळाली, तर हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर ठेवू, असे टी. राजा सिंह म्हणाले आहेत.हैदराबादेतल्या गोशमहल विधानसभेच्या जागेवरून टी. राजा सिंह हे भाजपाचे आमदार आहेत. तसेच भाजपा सत्तेत आल्यास भाजपा सिकंदराबाद आणि करिमनगरचंही नाव बदलेल, असंही टी. राजा सिंह पुढे म्हणाले आहेत. राजा सिंह म्हणाले, 1590मध्ये कुतुब शाह हैदराबादेत येण्यापूर्वी त्या शहराचं नाव भाग्यनगर होते. परंतु त्यानंतर भाग्यनगरचं नाव बदलून हैदराबाद ठेवण्यात आले. त्यावेळी हिंदूंवर हल्ला करण्यात आला होता. अनेक मंदिर नष्ट करण्यात आली. आम्ही हैदराबादच्या नामकरणाची योजना तयार करत आहोत.तेलंगणात भाजपा बहुमतानं विजयी होणार आहे. तेव्हा आम्ही पहिल्यांदा राज्याच्या विकासाला प्राधान्य देऊ आणि त्यानंतर हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करू, तसेच सिंकदराबाद आणि करिमनगरचेही नाव बदलू, असंही ते म्हणाले आहेत. मुगल आणि निजामांच्या नावांनी ठेवण्यात आलेल्या शहरांची नावं बदलून देशासाठी लढणा-या स्वातंत्र्यसैनिक किंवा शहिदांची नावं देऊ, टी. राजा सिंह यांनी असंही सांगितलं आहे. विशेष म्हणजे गुजरातमधल्या अहमदाबादचं नाव बदलून कर्णावती ठेवण्यात येणार असल्याच्या घोषणेनंतर टी. राजा सिंह यांचं हे विधान आलं आहे.