शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही ट्रम्प यांना ब्लाॅक करू शकता, इतरांना का नाही?; हायकोर्टाने ट्विटरला खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 06:43 IST

ब्लाॅक करण्याची नियमावली देण्याचे निर्देश

नवी दिल्ली : तुम्ही अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांचे खाते ब्लाॅक करू शकता तर हिंदू देवीदेवतांबाबत आक्षेपार्ह मजकूर पाेस्ट करणारी खाती बंद का करत नाही, असा प्रश्न उपस्थित करुन दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी मायक्राॅब्लाॅगिंग प्लॅटफाॅर्म ट्विटरला चांगलेच खडसावले. ट्विटरवरील खाते कशा प्रकारे ब्लाॅक करण्यात येतात, याबाबतची नियमावली आणि धाेरणाबाबत माहिती सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहे.प्रभारी मुख्य न्यायाधीश विपिन सांघी आणि न्या. नवीन चावला यांच्या खंडपीठापुढे काली मातेविराेधात ट्विटरवर आक्षेपार्ह मजकूर पाेस्ट करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली. आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या खात्याविराेधात काय कारवाई केली, याबाबत कोर्टाने ट्विटरला विचारणा केली. त्यावर ट्विटरची बाजू मांडणारे  वकील सिद्धार्थ लुथरा यांनी सांगितले, की याप्रकरणातील आक्षेपार्ह मजकूर हटविण्यात आला असून संबंधित पाेस्टबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या निर्णयाच्या अभावामुळे काेणत्याही व्यक्तीचे खाते ट्विटर ब्लाॅक करु शकत नाही, अशी माहितीही लुथरा यांनी दिली. मात्र, या उत्तराने हायकोर्टाचे  समाधान झाले नाही. जर असे आहे, तर तुम्ही डाेनाल्ड ट्रम्प यांना का ब्लाॅक केले हाेते, असा प्रश्न कोर्टाने केला. खाते ब्लाॅक करू शकत नाही, हा युक्तिवाद पूर्णपणे सत्य नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. दुटप्पी धाेरणावरून ताशेरेअशा प्रकारची घटना इतर धर्माबाबत घडली असती तर तुम्ही अधिक संवेदनशील आणि सावध असते. तुम्ही आक्षेपार्ह मजूकर टाकणाऱ्यांना ब्लाॅक करू शकता, हे दिसून येत नाही, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने ट्विटरवर ताशेरे ओढले.५०० हून अधिक अकाऊंट  भारतात ब्लॉक२.४ काेटी युझर्स भारतात ट्वीटरचे काही हॅशटॅगही हटविले हाेते. तसेच काही वादग्रस्त ट्विटही डिलीट केले होते.  मजकूर तपासाएथिइस्ट रिपब्लिक नावाच्या खात्यावरून संबंधित आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला हाेता. त्याविराेधात गेल्यावर्षी याचिका दाखल करण्यात आली हाेती.मजकूर तपासून आयटी कायद्यांतर्गत संबंधित खाते ब्लाॅक करण्याची गरज आहे का याबाबत निर्णय घेण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.

टॅग्स :Twitterट्विटरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प