शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

उद्या शेतकऱ्यांच्या रॅलीत हिंसाचार झाल्यास...; दहशतवादी संघटनेच्या मुखियाचा दिल्लीला फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 09:51 IST

Farmer protest, Tractor Rally in Delhi: शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानकडून रचण्यात आलेल्या मोठ्या कारस्थानाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रजासत्ताक दिनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस अलर्टवर आहेत.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये आंदोलक शेतकरी ट्रॅक्टर मार्च काढणार आहेत. याचबरोबर मुंबईतही आझाद मैदानावर लाखो शेतकरी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ट्रॅक्टर मार्चला दिल्लीत परवानगी देण्यात आली आहे. मार्गही ठरविण्यात आला आहे. सुमारे १२ हजार ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी होतील. शेतकऱ्यांना सोबत कोणतेही शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही दोन दिवसांपूर्वी एका शार्प शूटरला शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यामुळे सीआयएसएफच्या कंट्रोल रुमला एका बंदी घातलेल्या संघटनेकडून फोन आला होता. यामध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत धमकी देण्यात आली. 

सिख फॉर जस्टीस संघटनेचे दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू यांच्याकडून हा फोन कॉल करण्यात आला होता. यामध्ये जर उद्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये कोणताही हिंसाचार झाला तर त्याला संपूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला. २६ जानेवारीच्या आदल्या दिवशीच असा फोन आल्याने दिल्ली पोलीस आणि गुप्तहेर संघटना सतर्क झाल्या आहेत. 

सिख फॉर जस्टीस ही भारतात बंदी घातलेली संघटना आहे. या संघटनेचे नाव आधीही शेतकरी आंदोलनाशी जोडले गेले होते. हा फोन 13477934761 या नंबरवरून आला होता. या कॉलवरून सांगण्यात आले की, सिंघु बॉर्डरवर पंजाबचे शेतकरी जमलेले आहेत. आम्हाला कोणतीही हिंसा नको आहे. जर या रॅलीमध्ये कोणतीही हिंसा झाली तर भारतच यासाठी जबाबदार असेल, अशी धमकी देण्यात आली आहे. 

भारत सरकारने काही काळापूर्वीच गुरुपतवंत सिंह यांना दहशतवादी घोषित केले आहे. मोठ्या काळापासून ते खलिस्तानसाठी आवाज उठवत होते. 

पाकिस्तान सक्रीय...शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानकडून रचण्यात आलेल्या मोठ्या कारस्थानाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रजासत्ताक दिनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस अलर्टवर आहेत. दरम्यान शेतकरी आंदोलनात गडबड करण्यासाठी पाकिस्तानने ट्विटरवरून कारस्थान रचल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच पाकिस्तानमधून हँडल होत असलेल्या ३०८ ट्विटर अकाऊंटची पडताळणी पोलिसांकडून सुरू असून, हे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपPunjabपंजाब