आपल्याकडे एक म्हणत मोठी प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, "काळ आला होता पण वेळ आली नव्हती." काहीसा असाच प्रकार हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातून समोर आला आहे. येथे नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या भीषण पुराने अणेक घरं उद्धवस्त केली आणि अनेकांचे बळीही घेतले. अशाच एक संकटात सापडली होती मंडीतील सेराज खोऱ्यात राहणारी तुनेजा ठाकूर. तुनेजा पुरामुळे निर्माण झालेल्या ढिगाऱ्यात अडकली होती. ती जवळपास 5 तास या खाली दबलेली होती. अखेर मृत्यूचा पराभव झाला आणि तुनेजाला जिवंत बाहेर काढण्यात आलं.
कशी जिवंत राहिली? -ढगफुटीमुळे येथील शरण गावात भूस्खलन झाल्याने २० वर्षांची एक मुलगी मोठ्या ढिगाऱ्याखाली सापडली. दरम्यान, तिच्यावरील ढिगाऱ्यांचा भार वाढतच चालला होता. तुनेजाला समोर मृत्यू दिसत असतानाही तिने हार मानली नाही आणि जिवनासाठी ती संघर्ष करत राहिली. जिवंत राहण्याच्या तिच्या दृढनिश्चयाने तिला वाचवले. ती शेवट पर्यंत तिच्यावर कोसळणारा ढिगारा हटवत होती आणि श्वास घेण्यासाठी जागा तयार करत होती.
भूस्खलनानंतर मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच घरच्यांनी तिचा शोध घ्यायला सुरवात केली. यानंतर जवळपास 5 तासांनंतर संबंधित मुलगी एका ढिगाऱ्याखाली सापडली. तिने घरच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेले असताना, एक-एक सेकंद अनेक तासांच्या बरोबरीचा वाटत होता. मात्र आपण जिवंत बाहेर येणार असा आपल्याला विश्वास होता. अखेर घरच्यांनी तिला जिवंत बाहेर काढले.
तुनेजाने या संपूर्ण घटनेसंदर्भात बोलताना सांगितले की, आपत्ती आल्यानंतर, सर्वजण बाहेर धावले. घरात पाणी शिरताना पाहून भीतीने आरडा-ओरड सुरू झाली आणि सर्व जण सुरक्षित ठिकाणी धावू लागले. तेवढ्यात जमीनीच्या एका बागाला तडा गेला आणि मी त्याखाली दबले.