शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'मसूदला शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राईकची गरज नव्हती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 02:39 IST

दिग्विजय सिंह यांचा प्रज्ञासिंह यांच्यावर निशाणा; पठाणकोट, पुलवामा हल्ले का रोखले नाही?

भोपाळ : पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरलाही शाप दिला असता, तर भारतीय लष्कराला सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती, असा टोला लगावत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला.

भोपाळ येथील अशोका गार्डन्स येथे प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की, भारतासाठी प्राणाची आहुती देणारे एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांचा सर्वनाश होईल, असा मी शाप दिला होता, असे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले होते. मसूद अजहरलाही त्यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती.

आम्ही पाताळातही शोधून दहशतवाद्यांना मारू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात; परंतु पुलवामा, पठाणकोट आणि उरी येथे दहशतवादी हल्ले झाले तेव्हा ते कुठे होते? हे दहशतवादी हल्ले का रोखता आले नाहीत? असा सवाल करीत त्यांनी पंतप्रधानांवरही टीका केली.

काँग्रेसने भोपाळमधून माझी उमेदवारी घोषित केल्यानंतर ‘मामा’ जाम घाबरले आहेत. प्रकृती ठीक नाही, असे सांगून गौर यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या आदल्या दिवशी भाजपने प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी घोषित केली. 

धर्माच्या नावे सौदा करणाऱ्यांपासून सावध राहाहिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन भाऊ-भाऊ आहेत. हे लोक असे म्हणतात की, हिंदू धोक्यात असल्याने हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. ५०० वर्षे मुस्लिमांची देशात सत्ता होती तेव्हा कोणत्याही धर्माचे नुकसान झाले नाही. धर्माच्या नावे सौदा करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. आमच्या धर्मात ‘हर हर महादेव’ असा जयघोष करतो; परंतु भाजप ‘ हर हर मोदी’ नारा देत आहेत, त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhopal-pcभोपाळMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019