शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

मराठीने ‘करिअर’ झाले तर ती नक्की जगेल...

By admin | Updated: April 6, 2015 04:25 IST

नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी मराठी ज्ञानभाषा बनावी. मराठीमध्ये शिकूनही ‘करिअर’ होऊ शकते, ही भावना नव्या पिढीमध्ये निर्माण झाली तर मराठीवर कोणतेही

अविनाश थोरात, संत नामदेव नगरी (घुमान) -नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी मराठी ज्ञानभाषा बनावी. मराठीमध्ये शिकूनही ‘करिअर’ होऊ शकते, ही भावना नव्या पिढीमध्ये निर्माण झाली तर मराठीवर कोणतेही आक्रमण होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. घुमान येथे आयोजित ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जे. जे. सिंग, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते काश्मिरी साहित्यिक रेहमान राही, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, प्रकाश पायगुडे, स्वागताध्यक्ष भारत देसडला व ‘सरहद’चे संजय नहार उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे अध्यक्षस्थानी होते.‘वाहे गुरू की खालसा, वाहे गुरू की फतेह’ असे म्हणत फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली. मराठी भाषेसमोरील आव्हानांचा त्यांनी ऊहापोह केला. ते म्हणाले, मराठी ही जगात पहिल्या १५ भाषांपैकी एक आहे. तरीही तिच्यावरील आक्रमणाची चर्चा होते. पहिलीपासून मराठी शिकविण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली जाते. मात्र, मराठीतून शिकण्यासाठी पुस्तके उपलब्ध झाली पाहिजेत. त्यासाठी मराठीच्या उपासकांनी प्रयत्न करायला हवेत. संवेदना फक्त साहित्यच जिवंत ठेवू शकते. शेतकऱ्यांमध्ये संकटाचा सामना करण्याची शक्ती साहित्यातून निर्माण व्हायला हवी.देशाच्या विविधततेला जोडण्यासाठी अशा संमेलनांची गरज असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. मोरे यांनी, मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन केलेल्या कामगिरीचा इतिहास लिहिण्याचे काम सुरू करण्याची गरज प्रतिपादित  केली. पंढरपूर येथे संत तुकारामपीठ स्थापन करावे तसेच मध्य प्रदेशातील ‘कालिदास’ पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही संत नामदेव यांच्या नावाने महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकासाठी पुरस्कार सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली. पुस्तकांचे गावविनोद तावडे यांनी महाराष्ट्रामध्ये पुस्तकांचे एक गाव निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली. या गावात चार ते पाच लाख पुस्तके असतील, तसेच साहित्यिक व रसिकांचा संवाद घडेल अशी कल्पना असल्याचे ते म्हणाले. साहित्यिकांना निधीसाठी मंत्रालयाच्या दारात येण्याची गरज भासणार नाही. विजयादशमीच्या दिवशीच साहित्य व नाट्य संमेलनासाठीचा निधी दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. पुस्तकांची दुकाने कमी होत असल्याने प्रत्येक नगर परिषदेने पुस्तकांसाठी स्वस्त दरात गाळा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.महामंडळाचा हावरटपणा!साहित्य संमेलनाची तयारी सुरू असल्यापासून पंजाब सरकारच्या औदार्याच्या अनेक कहाण्या महामंडळ आणि आयोजकांकडून सातत्याने सांगितल्या जात आहेत. महामंडळाने यात जणू हावरटपणा दाखवत थेट पंजाब सरकारकडे पंढरपूरमधील संत नामदेवांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी निधीची मागणी करण्याचा ठराव केला. नामदेव समाजोन्नती परिषदेने सोडलेल्या या राष्ट्रीय स्मारकाच्या संकल्पासाठी ४० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उर्वरित खर्चाच्या निधी संकलनासाठी केंद्र सरकार आणि पंजाब सरकार यांनी अर्थसाहाय्य करावे, अशी याचना या ठरावात करण्यात आली आहे.