शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय घेईन महिलांना आरक्षण देण्याचा; राहुल गांधी यांनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 08:50 IST

राहुल गांधी यांनी तमिळनाडूतील महिलांच्या एका गटासाठी दिवाळीनिमित्त दिल्लीतील आपल्या निवासस्थानी शुक्रवारी मेजवानीचे आयोजन केले होते. त्यावेळी या महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

नवी दिल्ली : मी पंतप्रधान झालो तर माझा पहिला निर्णय महिलांना आरक्षण देण्याचा असेल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  राहुल गांधी यांनी तमिळनाडूतील महिलांच्या एका गटासाठी दिवाळीनिमित्त दिल्लीतील आपल्या निवासस्थानी शुक्रवारी मेजवानीचे आयोजन केले होते. त्यावेळी या महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. त्याचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर झळकविला आहे.

तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या गोष्टीची शिकवण द्याल या एका महिलेने विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, मी माझ्या मुलांना मानवतेची शिकवण देईन. त्या मूल्यांमुळे व्यक्तीची समज वाढते.  नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी  पाठिंबा दिला आहे. या मेजवानीप्रसंगी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यादेखील उपस्थित होत्या. 

मेजवानीत होते छोले भटुरे

यंदा झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात राहुल गांधी यांनी मुलागूमुडू येथील सेंट जोसेफ शाळेला भेट दिली होती. तिथे व्यायाम करतानाची छायाचित्रे त्यावेळी प्रसिद्ध झाली होती. याच शाळेत काम करणाऱ्या महिलांना त्यांनी दिवाळीनिमित्त मेजवानीचे आमंत्रण दिले होते. या मेजवानीत छोले भटुरेचाही समावेश होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस