शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

दिरंगाईने निर्णय घेतले असते, तर देश संकटात सापडला असता -गौतम अदानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 6:20 AM

 कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केले. या निर्णयाचे गौतम अदानी यांनी समर्थन केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास विश्वासातील मंडळींपैकी एक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने वेळीच योग्य निर्णय घेतले नसते, तर देश फार मोठ्या संकटात सापडला असता, असे अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी सांगितले. कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केले. या निर्णयाचे गौतम अदानी यांनी समर्थन केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास विश्वासातील मंडळींपैकी एक आहेत.

अदानी म्हणाले की, सर्वात मोठा उत्पादक तसेच सेवा पुरविणारा देश बनविण्यासाठी चालून आलेली योग्य संधी केंद्र सरकारने साधली. कोणत्याही संकल्पना या शंभर (पान ७ वर)टक्के बरोबर किंवा चूक नसतात. कोरोना साथीसारख्या अकस्मात उद्भवलेल्या संकटकाळात हाती उपलब्ध असलेल्या योग्य माहितीच्या आधारे कोणत्याही सरकारने ठोस निर्णय घेणे अपेक्षित असते, तसेच सतत मिळत राहणाऱ्या नव्या माहितीचे विश्लेषण करून आपल्या धोरणातही त्या सरकारने बदल केले पाहिजेत. गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार व प्रशासनाने अशा पद्धतीनेच काम केले असून, ते अभिनंदनास पात्र आहेत.

अदानी उद्योगसमूहाच्या वार्षिक अहवालात चेअरमन या नात्याने गौतम अदानी यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, आपल्यापेक्षा अधिक संपन्न असलेल्या देशांची कोरोनाशी लढताना दमछाक झाली आहे. या साथीच्या पार्श्वभूमीवर योग्य निर्णय घेण्यास केंद्र सरकारने वेळ दवडला असता, तर आपला देश मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता होती. त्याचा केवळ भारतावरच नव्हे, तर जगावरही परिणाम झाला असता. कोरोनाच्या साथीचा उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला आहे. मोठी जीवितहानी झाली आहे. असंख्य लोक बेकार झाले आहेत. स्थलांतरित मजुरांचे हाल अवघ्या देशाने पाहिले; पण केंद्र सरकारने योग्य वेळी हालचाली केल्या नसत्या, तर यापेक्षाही भयंकर गोष्टींना देशाला सामोरे जावे लागले असते.

सर्वांनीच बजावली उत्तम कामगिरीउद्योगपती गौतम अदानी म्हणाले की, कोरोना साथीशी मुकाबला करताना राजकीय नेते, डॉक्टर, अन्य वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, लष्कर, फेरीवाले, नागरिकांनी आपापल्या परीने योग्य कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच आपण कोरोनाशी उत्तम प्रकारे लढा देत आहोत. जनधन योजना, आधार, मोबाईल लिंकिंग या गोष्टींद्वारे केंद्र सरकारच्या योजनांचे जनतेला थेट फायदे मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी