शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची मोठी घोषणा

By मोरेश्वर येरम | Updated: January 13, 2021 14:52 IST

केजरीवाल याआधीपासून केंद्राकडे मोफत लस देण्याची मागणी करत आहेत.

ठळक मुद्देआप सरकारची दिल्लीतील नागरिकांना मोफत लस देण्याची तयारीकेंद्राने मोफत लस दिली नाही, तर दिल्लीकरांना केजरीवाल देणार मोफत लसदेशातील जनतेला स्वत:च्या खिशातून खर्च करुन लस घ्यायला लावणं अयोग्य असल्याचं मत

नवी दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्याची मागणी केली आहे. केंद्राने जर जनतेला मोफत लस दिली नाही, तर दिल्ली सरकार दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करुन देईल, अशी घोषणाच यावेळी केजरीवालांनी केली आहे. 

केजरीवाल याआधीपासून केंद्राकडे मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. पण केंद्राकडून अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मोफत लसीकरणाचा मुद्दा उचलून धरला. 

"भारत देशात गरीबीचं प्रमाण अधिक आहे आणि गेल्या १०० वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशा महाभयंकर महामारीचा सामना देशातील जनता करत आहे. लशीचा खर्च न परवडणारेही बहुसंख्य लोक देशात आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत द्यावी अशी मागणी केंद्राकडे केली होती. केंद्राकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो याची वाट आम्ही पाहत आहोत. केंद्रानं जर मोफत लस उपलब्ध करुन दिली नाही. तर दिल्लीतील नागरिकांच्या लसीकरणाचा खर्च दिल्ली सरकार करेल", असं अरविंद केजरीवाल म्हणाले. 

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणसीरम इंस्टिट्यूटने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून कोविशील्ड लशीची निर्मिती केली आहे. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यात सुरुवातीला देशातील अत्यावश्यक सेवेतील ३ कोटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल. 

सीरमच्या लशीचा एक डोस २०० रुपयांनासीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला केंद्र सरकारने कोव्हिशील्ड लशीची पहिली ऑर्डर दिली आहे. सीरमकडून सरकारला २०० रुपये प्रतिडोस अशा किंमतीने पहिली खेप विकण्यात आली आहे. सरकारसाठी एका डोसची किंमत २०० रुपये इतकी असली तरी खासगी व इतर फार्मा कंपन्या किंवा नागरिकांसाठी एका डोसची किंमत १ हजार रुपये इतकी असणार आहे.   

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या