केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची मोठी घोषणा

By मोरेश्वर येरम | Published: January 13, 2021 02:48 PM2021-01-13T14:48:58+5:302021-01-13T14:52:39+5:30

केजरीवाल याआधीपासून केंद्राकडे मोफत लस देण्याची मागणी करत आहेत.

If the Center refuses we will give free vaccines says Kejriwal | केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची मोठी घोषणा

केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची मोठी घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देआप सरकारची दिल्लीतील नागरिकांना मोफत लस देण्याची तयारीकेंद्राने मोफत लस दिली नाही, तर दिल्लीकरांना केजरीवाल देणार मोफत लसदेशातील जनतेला स्वत:च्या खिशातून खर्च करुन लस घ्यायला लावणं अयोग्य असल्याचं मत

नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्याची मागणी केली आहे. केंद्राने जर जनतेला मोफत लस दिली नाही, तर दिल्ली सरकार दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करुन देईल, अशी घोषणाच यावेळी केजरीवालांनी केली आहे. 

केजरीवाल याआधीपासून केंद्राकडे मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. पण केंद्राकडून अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मोफत लसीकरणाचा मुद्दा उचलून धरला. 

"भारत देशात गरीबीचं प्रमाण अधिक आहे आणि गेल्या १०० वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशा महाभयंकर महामारीचा सामना देशातील जनता करत आहे. लशीचा खर्च न परवडणारेही बहुसंख्य लोक देशात आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत द्यावी अशी मागणी केंद्राकडे केली होती. केंद्राकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो याची वाट आम्ही पाहत आहोत. केंद्रानं जर मोफत लस उपलब्ध करुन दिली नाही. तर दिल्लीतील नागरिकांच्या लसीकरणाचा खर्च दिल्ली सरकार करेल", असं अरविंद केजरीवाल म्हणाले. 

देशात १६ जानेवारीपासून लसीकरण
सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून कोविशील्ड लशीची निर्मिती केली आहे. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यात सुरुवातीला देशातील अत्यावश्यक सेवेतील ३ कोटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल. 

सीरमच्या लशीचा एक डोस २०० रुपयांना
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला केंद्र सरकारने कोव्हिशील्ड लशीची पहिली ऑर्डर दिली आहे. सीरमकडून सरकारला २०० रुपये प्रतिडोस अशा किंमतीने पहिली खेप विकण्यात आली आहे. सरकारसाठी एका डोसची किंमत २०० रुपये इतकी असली तरी खासगी व इतर फार्मा कंपन्या किंवा नागरिकांसाठी एका डोसची किंमत १ हजार रुपये इतकी असणार आहे.  
 

Web Title: If the Center refuses we will give free vaccines says Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.