शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

अर्भक गायब झाले तर रुग्णालयाचे  लायसन्स रद्द करा; सर्वोच्च न्यायालय संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 11:04 IST

Supreme Court Latest News: बालकाला पळवून नेण्याच्या प्रकरणातील आरोपींना मंजूर झालेल्या जामीनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

नवी दिल्ली : नवजात अर्भक गायब झालेल्या रुग्णालयाचा परवाना रद्द करणे, हे कारवाईचे पहिले पाऊल असले पाहिजे, असा संताप सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका सुनावणीदरम्यान व्यक्त केला. बालकांना पळवून नेण्याच्या वाढत्या घटनांबद्दल न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच या समस्येला आळा घालण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

बालकाला पळवून नेण्याच्या प्रकरणातील आरोपींना मंजूर झालेल्या जामीनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. 

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, आरोपींना जामीन देण्याबाबत विचारपूर्वक निर्णय देण्यात आला नाही. जामीन मंजूर करताना आरोपीने पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधन आवश्यक होते. जामीनावर सुटलेले आरोपी कुठे आहेत, याकडे पोलिसांनीही लक्ष दिले नाही, असे न्यायालयाने म्हटले.

न्या. पारडीवाला यांनी सांगितले की, आरोपीला मूल हवे होते. त्यासाठी त्याने ४ लाख रुपयांना नवजात अर्भक विकत घेतले. एखाद्याला मूल हवे असेल तरी त्यासाठी कुणाचेही बाळ चोरून आणणे व ते विकत घेणे, हे मार्ग नाहीत.  

सर्वाधिक घटना महाराष्ट्रात, तेलंगणात

भारतामध्ये बालकांना पळवून नेणे व त्यांची होणारी तस्करी याची दरवर्षी सुमारे २ हजार प्रकरणे नोंदविली जातात.  नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालानुसार २०२२ साली अशा २,२५० प्रकरणांची नोंद झाली आणि यातील सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र, तेलंगणा आणि बिहार या राज्यांत घडली आहेत.

किती खटले प्रलंबित? 

राज्यनिहाय बालकांना पळवून नेणे गुन्ह्यांचे किती खटले प्रलंबित आहेत, याची उच्च न्यायालयाने माहिती मागवावी. हलगर्जीपणा झाला तर तो न्यायालयाचा अवमान मानला जाईल, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHuman Traffickingमानवी तस्करी