शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:20 IST

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी, महामार्ग मंत्रालयाने बांधा-वापरा-हस्तांतरित (बीओटी) करा मॉडेलअंतर्गत बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या एका विभागात एका वर्षात एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदारांना दंड करण्याचा निर्णय घेतला आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव व्ही. उमाशंकर म्हणाले की, महामार्ग मंत्रालयाने बीओटी दस्तऐवजात सुधारणा केली आहे. आता कंत्राटदार अपघात व्यवस्थापनासाठी जबाबदार असतील आणि त्यांनी बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या एका विभागात निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास सुधारणात्मक पावले उचलली जातील. ते म्हणाले, जर एखाद्या विभागात ५०० मीटरमध्ये एकापेक्षा जास्त अपघात झाले तर कंत्राटदाराला २५ लाख रुपये दंड आकारला जाईल. पुढच्या वर्षी पुन्हा अपघात झाला तर दंडाची रक्कम ५० लाख रुपयांपर्यंत वाढेल. उमाशंकर म्हणाले की, महामार्ग मंत्रालयाने ३,५०० अपघातप्रवण क्षेत्रे चिन्हांकित केली आहेत.

१.८० लाख अपघाती मृत्यू

  • संपूर्ण भारतातील रस्ते अपघातांमधील मृत्यूसंख्या अंदाजे १.८० लाख एवढी आहे. यामध्ये महामार्ग व इतर सर्व रस्त्यांचा समावेश.
  • भारतात राष्ट्रीय महामार्ग हे संपूर्ण रस्त्यांच्या २ टक्के आहेत, पण अपघातांमधील मृत्यूंमध्ये त्यांचा वाटा ३० टक्क्यांपेक्षा जास्त.
  • अपघातांमध्ये दुचाकी आणि पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक.

कशामुळे होतात अपघात?

अतिवेग, वाहनचालकाने चुकीचे वाहन चालवणे, हेल्मेट/सीटबेल्ट न वापरणे व इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रात २०२४ मध्ये महामार्गांवर ३६,०८४ अपघात झाले असून, यामध्ये १५,३३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात अपघाती मृत्यूंची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. २०२३ मध्ये देशात एकूण ४.४४ लाख अपघाती मृत्यू झाले असून हा आकडा २०२२ च्या तुलनेत ३.१ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या दशकात (२०१३–२०२३) अपघाती मृत्यूंमध्ये सुमारे ११ टक्क्यांची वाढ  झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Penalty for Contractors if Accidents Occur on National Highways

Web Summary : Contractors face penalties up to ₹50 lakh for accidents on highways built under BOT. The government is marking accident-prone areas. India sees high road fatalities, with national highways contributing significantly. Over-speeding and rule violations are major causes.
टॅग्स :Accidentअपघात