शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटल्यास...; कोलकाता हायकोर्टाने फटकारले, नेमके काय झाले होते? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 08:06 IST

...त्यानंतर उच्च न्यायालयाच्या पोर्ट ब्लेअर खंडपीठाचे न्यायाधीश जय सेनगुप्ता यांनी आरोपीची शिक्षा कायम ठेवली.

कोलकाता : जर एखाद्या व्यक्तीने अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले तर तो लैंगिक छळाचा गुन्हा मानला जाईल आणि त्याला आयपीसीच्या कलम ३५४ अ अंतर्गत तुरुंगात जावे लागू शकते, असे कोर्टाने म्हटले आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या पोर्ट ब्लेअर खंडपीठाचे न्यायाधीश जय सेनगुप्ता यांनी आरोपीची शिक्षा कायम ठेवली.

नेमके काय झाले होते? - पीडित महिला पोलिस कॉन्स्टेबल दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लाल टिकरी येथे जात होती. 

- जेव्हा पोलिसांचे पथक वेबी जंक्शनवर पोहोचले तेव्हा त्यांना  कळाले की, एक व्यक्ती लोकांना त्रास देत आहे. काही पोलिसांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात नेले. तर पीडिता आणि काही पोलिस एका दुकानासमोर थांबले होते. 

- दुकानासमोर उभ्या असलेल्या आरोपीने फिर्यादीला अश्लील प्रश्न विचारला की, डार्लिंग चालान करायला आली होती का? यावर, मयाबंदर पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३५४ अ (१) (iv) आणि ५०९ (महिलेच्या विनयभंगाच्या उद्देशाने शब्द, हावभाव किंवा कृत्य) अंतर्गत आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.

कोर्टाने निकाल देताना म्हटले की...अज्ञात महिलेला ‘डार्लिंग’ अशा शब्दांनी हाक मारणे गुन्हा आहे. किमान सध्या तरी आपल्या समाजात रस्त्यावरील पुरुष अज्ञात महिलेसाठी कोणतीही भीती न बाळगता असे काहीही बोलण्यासाठी परवानगी असणारे कायदे नाहीत. 

कलम ३५४अ (स्त्रींच्या विनयशीलतेचा अपमान करणारा) संदर्भ देत न्यायमूर्ती सेनगुप्ता म्हणाले की हा कायदा अश्लील शब्दांचा वापर गुन्हा ठरवतो. पोलिस असो की अन्य कोणत्याही अज्ञात महिलेला ‘डार्लिंग’ म्हटले जाऊ शकत नाही. हे लैंगिक छळासारखेच कृत्य आहे.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी