शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

देशात गांधी विचार हरले; ही चिंतेची बाब - दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 17:36 IST

प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाच्या अडचणी वाढल्या होत्या

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला 350 हून अधिक जागा मिळाल्याने देशात पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत दारुण पराभव सहन करावा लागला. देशात आज महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या विचारधारेचा विजय झाला आहे. गांधी विचार देशात हरले ही देशासाठी चिंतेची बाब आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी दिली आहे. 

भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार प्रज्ञा सिंह यांनी दिग्विजय सिंह यांचा पराभव करत विजय प्राप्त केला आहे. भोपाळच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवत दिग्विजय सिंहांचा लाखो मतांनी पराभव केला. भोपाळमधील विजय हा मोदींच्या विश्वासाचा विजय आहे. त्यांनी सामान्य लोकांसाठी जी कामे केली त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे असं प्रज्ञा सिंह यांनी सांगितले. 

प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाच्या अडचणी वाढल्या होत्या. प्रज्ञा सिंह यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी या विधानावरून भाजपावर चौफेर टीका झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही  प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना प्रज्ञा यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना मनाने कधीच माफ करू शकणार नाही असं म्हटलं होतं. 

भोपाळ हा भाजपाचा गड असून प्रज्ञा यांच्या उमेदवारीचे पंतप्रधान मोदींपासून वरिष्ठ नेत्यांनी समर्थन केले होते. प्रज्ञा ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरें यांच्याबद्दल त्यांनी सुरुवातीलाच वादग्रस्त वक्तव्य केले होते. नंतर त्यांना माफी मागावी लागली होती.

गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भोपाळ मतदारसंघातून पहिल्या फेरीपासून प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मताधिक्य घेतलं होतं. प्रज्ञा सिंह यांना 8 लाख 65 हजार 212 मते पडली तर काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांना 5 लाख 1 हजार 279 मते पडली. तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी प्रज्ञा सिंह यांनी दिग्विजय सिंह यांचा पराभव केला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालDigvijaya Singhदिग्विजय सिंहSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाcongressकाँग्रेसbhopal-pcभोपाळ