शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

IDBI Bank Vacancy: लेखी परीक्षा होणार नाही; आयडीबीआय बँकेत भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 16:10 IST

IDBI Bank Recruitment 2020: पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. 

IDBI Bank Recruitment 2020: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांसाठी भरती काढली आहे.

 पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. 

पदे : डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड-डी) - 11 पदेअसिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड-सी) - 52 पदेमॅनेजर (ग्रेड-बी) - 62 पदेअसिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) - 09 पदेएकूण पदांची संख्या - 134

शिक्षणाची अट वेगवेगळ्या पदांसाठी आणि विभागांसाठी वेगवेगळी शिक्षणाची अट घालण्यात आली आहे. कोणत्याही विषयातील सामान्य पदवीधारक, बीएससी ऑनर्स, बीकॉम, बीई/बीटेक, एमसीए, मास्टर्स इन कम्युनिकेशन, इकोनॉमिक्स व चार्टर्ड अकाउंटेंट यासाठी अर्ज करू शकणार आहेत. कोणत्या पदासाठी कोणती योग्यता लागेल याची माहिती खाली दिलेल्या नोटिफिकेशनच्या लिंकवर जाऊन क्लिक करा.

LIC मध्ये भरती; विना परिक्षा होणार निवड, 14 लाखांपर्यंतचे पॅकेज

अर्ज कसा कराल? या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आयडीबीआय बँकेच्या वेबसाईट idbibank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात २४ डिसेंबर २०२० पासून होत आहे. ७ जानेवारी २०२१ शेवटची तारीख असणार आहे. अर्जासाठीची लिंक पुढे देण्यात आली आहे. 

निवड कशी होईल? या पदांसाठी आलेल्या अर्जांद्वारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे.  यानंतर त्यांना ग्रुप डिस्कशन / पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. 

डायरेक्ट लिंक्सIDBI Bank SCO notification 2020 साठी इथे क्लिक करा...Apply करण्यासाठी २४ डिसेंबरपासून इथे क्लिक करा... IDBI Bank च्या वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...

 

Government Jobs: कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, क्लार्क, नर्ससाठी शेकडो पदांवर भरती; केंद्र सरकारी नोकरीची संधी

Bank of Baroda Recruitment 2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांच्या जागा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन काढले आहे. यानुसार या पदांवर ८ जानेवारी  २०२१ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. 

BOB Recruitment 2020-21: पदांची संख्याबँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट अधिकारी (Recruitment of Specialist Officers) च्या एकूण 32 जागा भरायच्या आहेत. यामध्ये २७ पदे सिक्युरिटी ऑफिसर तर ५ पदे फायर ऑफिसर (Fire Officers) ची आहेत. 

Bank Of Baroda Job Vacancy शैक्षणिक अटBOB Recruitment 2020-21 नुसार सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयाची पदवी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तर फायर ऑफिसरसाठी उमेदवाराकडे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (NFSC) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विश्वविद्यालयाच्या सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग किंवा फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी इंजिनिअरिंगची डिग्री असणे आवश्यक आहे. 

LICHFL Vacancy 2020: जीवन बीमा निगम (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) भरती निघाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनीपासून  असिस्टंट मॅनेजर या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांचे वार्षिक पे स्केल १४ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. 

जर तुम्ही एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीईची डिग्री घेतली असेल  तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या पदांवर अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिली जात आहे. 

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीjobनोकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक