शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

IDBI Bank: LIC नंतर आता 'या' सरकारी बँकेचे होणार खासगीकरण, 2021मध्येच झाली होती घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 21:37 IST

IDBI Bank: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी 2021 मध्येच या बँकेच्या खासगीकरणाची घोषणा केली होती.

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या काळात अनेक सरकारी संस्थांचे खासगीकरण करण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच LICमधील एक मोठा हिस्सा विकण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता सरकारने IDBI Bank चे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याची प्रक्रिया सुरू होणार असून, मे महिन्यापर्यंत अनेक महत्वाची अपडेट समोर येऊ शकतात. 

2021 मध्येच झाली होती घोषणाकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण(Nirmala Sitharaman) यांनी फेब्रुवारी 2021 च्या अर्थसंकल्पात IDBI बँकेसह अजून दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. पण, कोरोनामुळे ही खासगीकरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. आता ही प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, ही माहिती समोर येताच बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. बुधवार IDBIचे शेअर्स 7.85% वाढून 48.75 रुपयांवर बंद झाले.

मे महिन्यात बोली लागण्याची शक्यताकोरोना परिस्थिती सुधारली आहे, त्यामुळेच आता IDBI बँकेच्या खासगीकरण्याची प्रक्रिया केव्हाही सुरू होऊ शकते. सरकारला चांगल्या किमतीवर ही बँक विकायची आहे, त्यामुळे आतापासूनच याच्या व्हॅल्यूएशनवर काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार मे महिन्यात बिड्स म्हणजेच एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoIs) आमंत्रित करण्याचा विचार करत आहे. 

IDBI बँकेत सरकार-LIC चा वाटासध्या IDBI Bank मध्ये भारत सरकारचा 45.48% आणि भारतीय जीवन बीमा निगम (LIC)चा 49.24% वाटा आहे. यानुसार, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या IDBI Bank मध्ये सरकारचा 94% पेक्षा अधिकचा वाटा आहे. सध्या एलआयसी IDBI Bank ची प्रमोटर असून, बँकेचे मॅनेजमेंट कंट्रोलही त्यांच्याकडे आहे.

किती टक्के वाटा विकणार?सरकार IDBI बँकेतील आपला संपूर्ण 45.48 टक्के वाटा विकण्याच्या तयारीत आहे. LIC च्या बोर्डाने एक प्रस्ताव पास केला आहे, ज्यानुसार तेदेखील बँकेतील आपला वाटा कमी करू शकतात. परंतू, सरकार गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी यात काही बदल करू शकते. यावर नेमका काय निर्णय होईल, हे येणाऱ्या काळात कळेल.

टॅग्स :bankबँकNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन