शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

गंगाजलानं कोरोना ठीक होतो का पाहा; मोदी सरकारच्या सूचनेवर शास्त्रज्ञांचं 'सायंटिफिक' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 11:06 IST

जल शक्ती मंत्रालयाचा प्रस्ताव आयसीएमआरनं फेटाळला

नवी दिल्ली: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) जल शक्ती मंत्रालयाचा प्रस्ताव फेटाळला आहे. कोरोना विषाणूवरील उपचारात गंगाजल उपयोगी ठरू शकतं का, याबद्दल संशोधन करण्याचं आवाहन जल शक्ती मंत्रालयानं आयसीएमआरनं केलं होतं. मात्र अशा प्रकारच्या संशोधनासाठी शास्त्रीय आकडेवारीची आवश्यकता असल्याचं उत्तर देत आयसीएमआरनं जल शक्ती मंत्रालयाचा प्रस्ताव फेटाळून लावला.कोरोनाची बाधा झालेल्यांवर उपचार करण्यासाठी गंगाजल फायदेशीर ठरू शकतं याची कोणतीही ठोस आणि अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे याबद्दल संशोधन करता येणार नाही, असं आयसीएमआरकडे येणाऱ्या संधोधन प्रस्तावांचं मूल्यांकन करणाऱ्या समितीचे प्रमुख डॉ. वाय. के गुप्ता यांनी सांगितलं. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी गंगाजलाचा वापर होऊ शकतो. त्यामुळे याबद्दल संशोधन करण्यात यावं, अशी मागणी जल शक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन'मध्ये काम करणाऱ्या अनेकांनी केली होती. 'राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन'मध्ये काम करणाऱ्या अनेकांसह काही स्वयंसेवी संस्थांनीदेखील गंगाजलाच्या वैद्यकीय उपयोगाबद्दल संशोधन करण्याची मागणी केली होती. त्यामुळे जल शक्ती मंत्रालयानं याबद्दलचा प्रस्ताव आयसीएमआरकडे पाठवला. एखादं संशोधन सुरू करताना त्याच्याशी संबंधित आकडेवारी, तथ्यं, माहिती आवश्यक असते. त्याला वैज्ञानिक आधार असावा लागतो. त्यानंतर त्याच्यावर संशोधन करता येतं. आम्ही ही माहिती जल शक्ती मंत्रालयाला कळवली आहे, असं डॉ. वाय. के गुप्ता म्हणाले. गुप्ता यांनी याआधी एम्समध्ये अधिष्ठाता पदावर काम केलं आहे.लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठारऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतून बचावलेल्या मजुराने सांगितलं नेमकं काय घडलं!औरंगाबादमधील रेल्वे अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल; रेल्वे मंत्र्यांना दिल्या सूचना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या