शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
2
चीनची 'पॉवर परेड'! अण्वस्त्रे, समुद्री ड्रोन आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे
3
“मनोज जरांगेंना अपेक्षित झालेले नाही, शेवटच्या क्षणी...”; वकील असीम सरोदेंचा मोठा दावा
4
पुतिन-जिनपिंग अन् किम यांचं अमेरिकेविरोधात षडयंत्र; चीनमधील परेड पाहून डोनाल्ड ट्रम्प संतापले
5
फक्त ४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर
6
"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
7
ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा
8
"एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर...", श्रीकांत शिंदे आरक्षणाच्या निर्णयावर काय बोलले?
9
६० कोटी घोटाळ्याचा आरोप, शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय! मुंबईतील 'बॅस्टियन' रेस्टॉरंटला लागणार कुलूप
10
Maharashtra Accident: मुंबईवरून निघाले... कसाऱ्याजवळ मृत्यूने गाठले; कारचा भीषण अपघात, तिघे ठार
11
Virat Kohli Fitness Test : कोहलीसाठी कायपण! BCCI नं परदेशातच घेतली फिटनेस टेस्ट?
12
बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले...
13
"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार
14
मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना स्वामींचे स्मरण करता की नाही? ‘असा’ आहे कालातीत ऋणानुबंध
15
Mark Mobius Prediction: चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
16
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?
17
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
18
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
19
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
20
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार

CoronaVirus News : कोरोनाला हरवण्यासाठी ICMR नवा प्लॅन; सर्व राज्यांना दिला 'हा' सल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 10:16 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : आयसीएमआरने IgG ELISA टेस्ट किट विकसित केले आहे.

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत 1,83,143 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एकूण 5,164 लोकांचा मृत्यू झाला आहे.सरकारने देशात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. यातच कोरोनावर मात करण्यासाठी काम करत असलेल्या आयसीएमआरने सर्व राज्यांना एक सर्व्हे करण्यास सांगितले आहे. सामान्य लोकसंख्या आणि उच्च धोका असलेल्या लोकसंख्येमध्ये किती प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे, याची माहिती घेण्यासाठी IgG ELISA टेस्टच्या माध्यमातून सीरो सर्व्हे (sero-survey) करण्याचा सल्ला आयसीएमआरने राज्यांना दिल्या आहेत. 

आयसीएमआरने IgG ELISA टेस्ट किट विकसित केले आहे. तसेच, आयसीएमआरने हे प्रशिक्षण अनेक कंपन्यांना दिले आहे, कारण मोठ्या प्रमाणात IgG ELISA टेस्ट किट तयार केल्या जाऊ शकतील. IgG ELISA टेस्ट किटच्या माध्यमातून समजेल की, कोणत्या लोकांमध्ये IgG अँटीबॉडी तयार आहे. तसेच, यामुळे कळेल की, किती लोकांना कोरोनाची लागण झाली होती. 

विशेष म्हणजे, या टेस्टमुळे ज्या लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, आता त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत, हे सुद्धा समजणार आहे. अँटीबॉडी टेस्ट आजारी पडल्यानंतर पाच ते सात दिवसानंतर करणे योग्य आहे. कारण, आजारी पडल्यानंतर अँटीबॉडी तयार होण्यास सुरुवात होते. सीरो सर्वेक्षणाच्या मदतीने लोकांच्या आरोग्याविषयीची योग्य प्रकारे माहिती मिळेल. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी पुढील प्लॅन तयार करता येऊ शकतो, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत 1,83,143 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एकूण 5,164 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता, सरकारने देशात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या