खंडपीठाच्या मागणीसाठी इचलकरंजी बार असोसिएशनचे आंदोलन
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
(फोटो)१२१२२०१४-आयसीएच-०२इचलकरंजी : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, यासाठी खंडपीठ कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनात येथील बार असोसिएशनने सहभागी होऊन न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून आंदोलन यशस्वी केले, अशी माहिती अध्यक्ष ॲड. एस. एन. मुदगल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या सहा जिल्ांत एकदिवसीय न्यायालयीन ...
खंडपीठाच्या मागणीसाठी इचलकरंजी बार असोसिएशनचे आंदोलन
(फोटो)१२१२२०१४-आयसीएच-०२इचलकरंजी : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, यासाठी खंडपीठ कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनात येथील बार असोसिएशनने सहभागी होऊन न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून आंदोलन यशस्वी केले, अशी माहिती अध्यक्ष ॲड. एस. एन. मुदगल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या सहा जिल्ांत एकदिवसीय न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचे आंदोलन पुकारण्यात आले होते. येथील बार असोसिएशननेही यामध्ये सहभाग घेतला. यावेळी ॲड. अनिल रुईकर, ए. आर. जाधव, व्ही. बी. चव्हाण सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)(फोटो ओळी)