शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
4
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
5
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
6
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
7
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
8
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
9
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
11
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
12
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
13
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
14
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
15
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
16
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
17
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
18
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
19
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
20
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत

जाहिरातीचा डोक्याला 'शॉट', सरकारने मारली काट! बलात्काराच्या विकृतीला प्रोत्साहन दिल्याचा आक्षेप 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 7:07 AM

I&B Ministry suspends controversial deodorant advertisement : मंत्रालयाने ट्विटर आणि यूट्यूबला ही जाहिरात त्वरित हटवण्यास सांगितले आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटरद्वारे सांगितले. 

नवी दिल्ली : एका बॉडी स्प्रे ब्रँडच्या दोन जाहिरातींमुळे मोठा वाद निर्माण झाला असून यातून बलात्काराच्या विकृतीला प्रोत्साहन दिल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे सरकारने शनिवारी ट्विटर आणि यूट्यूबला दोन्ही वादग्रस्त जाहिराती तातडीने काढून टाकण्याचे आदेश दिले. “सोशल मीडियावर बॉडी स्प्रेची अयोग्य आणि अपमानास्पद जाहिरात प्रसारित केली जात असल्याचे लक्षात आले आहे. मंत्रालयाने ट्विटर आणि यूट्यूबला ही जाहिरात त्वरित हटवण्यास सांगितले आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटरद्वारे सांगितले. 

नियमांचे गंभीर उल्लंघनभारतीय जाहिरात प्रमाणीकरण परिषदेने या जाहिरातीचे नियमांचे ‘गंभीर उल्लंघन’ आणि सार्वजनिक हिताच्या विरुद्ध असल्याचे नमूद केल्यानंतर ही कारवाई केली. 

पहिल्या जाहिरातीत काय? चार तरुण मुले एका दुकानात बोलत असतात. परफ्यूमची शेवटची बाटली पाहून आपल्या चौघांपैकी ‘शॉट’ कोण घेणार यावर चर्चा करतात. यावेळी बॉडी स्प्रेऐवजी तरुणी दाखविली आहे. त्यांचे संवाद ऐकून मुलगी थरथर कापत मागे वळते. ते आपल्याबाबात बोलत आहेत असे तिला वाटते. 

दुसऱ्या जाहिरातीत काय?  बेडरूममधील जोडप्यापासून सुरू होते. चार मित्र तिथे येतात व ‘लगता है शॉट मारा, अब हमारी बारी’ असे म्हणतात. जाहिरात पूर्ण पाहिल्यानंतर मित्रांनी खोलीतील परफ्यूम वापरता येईल का, अशी विचारणा केल्याचे कळते.

स्वरा भास्कर, फरहान अख्तर यांच्यासारख्या अनेक कलाकारांनीही यावर सडकून टीका केली. टीव्ही चॅनलवरूनही ही जाहिरात हटविली आहे.

ही लज्जास्पद आणि वाह्यात जाहिरात बलात्कार विकृतीला प्रोत्साहन देत आहे. आम्ही या कंपनीवर कठोर कारवाईची मागणी करत आहोत.     - स्वाती मालीवाल, अध्यक्ष, दिल्ली महिला आयोग

टॅग्स :Information & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालय