शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आयबी, सीबीआय, रॉमध्ये होणार फेरबदल, हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 06:07 IST

लवकरच पंतप्रधान कार्यालय (पीएमओ)आणि टॉपच्या तीन गुप्तचर व तपास संस्थांमध्ये मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. रॉ, आयबी आणि सीबीआय या संस्थांमध्ये प्रमुख पदाच्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली - लवकरच पंतप्रधान कार्यालय (पीएमओ)आणि टॉपच्या तीन गुप्तचर व तपास संस्थांमध्ये मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. रॉ, आयबी आणि सीबीआय या संस्थांमध्ये प्रमुख पदाच्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.उच्चसूत्रांनी सांगितले की, ३० नोव्हेंबर रोजी अर्थ व महसूल सचिव हसमुख अधिया सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना ओएसडी म्हणून पुन्हा घेतले जाऊ शकते. सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत त्यांना मुदतवाढ मिळू शकते. अर्थ मंत्रालयातील व्यवस्था सरकार विस्कळीत करू इच्छित नाही. कॅबिनेट सचिव पदासाठीही त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, मोदी यांनी त्यांची नियुक्ती अर्थ मंत्रालयात केली. दरम्यान, १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले जी. सी. मुर्मू यांना महसूल सचिव केले जाऊ शकते.रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंगचे (सचिव अनिल धस्माना जानेवारीत निवृत्त होत आहेत. रॉमध्ये दोन नंबरवर असलेल्या समत कुमार गोयल यांच्या नावाचा विचार पदोन्नतीसाठी होत होता. मात्र, अस्थाना प्रकरणाशी संबंधित सीबीआय वादात त्यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या पदोन्नतीबाबत अनिश्चितता आहे.आयबीचे संचालक राजीव जैन जानेवारीत निवृत्त होणार आहेत.तेथील विशेष संचालक अरविंद कुमार हे त्यांचे उत्तराधिकारी होऊ शकतात. ते आसामच्या १९८४ च्या बॅचचे अधिकारी आहेत.आलोक वर्मा यांना सीबीआयमध्ये पुन्हा आणले तरी ते १ फेब्रुवारी २०१९ रोजी निवृत्त होतील. या पदासाठी क्रमांक दोनचे अधिकारी राकेश अस्थाना हे स्पर्धेत आहेत. बीएसएफचे प्रमुख रजनीकांत मिश्रा आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक हे या पदासाठी स्पर्धेत आहेत.पटेल यांचे काय होणार?पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांचे असे मत आहे की, आरबीआयच्या बोर्डाची १९ रोजी मुंबईत बैठक होणार आहे. यावेळी कोणत्याही असुरक्षित परिस्थितीची शक्यता नाही. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल हे संकट दूर करण्याची शक्यता नाही. सरकारने तर असे संकेत दिले आहेत की, जर उर्जित पटेल बाजूला झाले तर, हसमुख अधिया हे नवे गव्हर्नर असू शकतात.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागGovernmentसरकार