शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! हार, मिठाई आणि कोर्ट फी; IAS अधिकाऱ्याने IPS सोबत फक्त 2 हजारांत केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 15:20 IST

IAS अधिकारी युवराज मरमट आणि  IPS अधिकारी पी. मोनिका यांनी अत्यंत साधेपणाने केलेल्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

IAS अधिकारी युवराज मरमट आणि  IPS अधिकारी पी. मोनिका यांनी अत्यंत साधेपणाने केलेल्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. कोर्ट मॅरेज करून अधिकारी जोडप्याने गेल्या आठवड्यात लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे मोठ्या पदावर बसलेल्या या जोडप्याने अवघ्या 2000 रुपयांमध्ये लग्न केलं आहे.

छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात तैनात असलेले आयएएस अधिकारी युवराज मरमट यांनी तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी पी. मोनिकासोबत लग्न केलं आहे. कोर्ट रूममध्येच हार घालण्याचा कार्यक्रम झाला. साधेपणाने या जोडप्याने एकमेकांना हार घालून उपस्थित लोकांना मिठाई वाटली. या लग्नात दोन फुलांचे हार, मिठाई आणि कोर्ट फी असा एकूण 2 हजार रुपये खर्च करण्यात आला. 2021 मध्ये UPSC मध्ये निवड होण्यापूर्वी, युवराज मरकटची IIT BHU मध्ये देखील निवड झाली आहे. दुसरीकडे, आयपीएस अधिकारी पी. मोनिकाने पॅथलॉजीचा कोर्स केला आहे. इतकंच नाही तर फिटनेस, स्पोर्ट्ससोबतच तिला ब्युटी फॅशनमध्येही रस आहे. IAS अधिकारी युवराज मरकटची पहिली पोस्टिंग रायगडमध्ये झाली आहे. 

सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेला युवराज नुकताच जिल्हा मुख्यालयात आला आहे. सर्वप्रथम त्याने त्याची गर्लफ्रेंड पी मोनिकासोबत कोर्ट मॅरेज करून सेटल होणं योग्य मानलं आहे. यानंतर, तो पुढील प्लॅन करत आहे. या कोर्ट मॅरेजनंतर पती-पत्नी दोघेही कॅमेऱ्यासमोर आलेले नाहीत आणि अचानक झालेल्या लग्नाबद्दल काहीही बोलले नाहीत.

दोघांनी प्रेमविवाह साधेपणाने केला. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आशीर्वादही दिले. यासोबतच सीईओ जिल्हा पंचायत जितेंदर यादव यांनीही नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुश्री संतन देवी जांगडे यांच्या हस्ते लग्नाचं सर्टिफिकेट प्रदान करण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न