नवी दिल्ली : 2015 च्या बॅचचे यूपीएससी टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांनी गेल्या शनिवारी काश्मीरमधील पहलगामध्ये विवाह केला. अतहर आमिर हे मूळचे काश्मीरमधील आहेत. 2015 मध्ये ते यूपीएससीमधील सेकंड टॉपर होते. मिळालेल्या माहितीनुसार, टीना डाबी या विवाह सोहळ्यासाठी गेल्या शुक्रवारी रात्री आपल्या कुटुंबीयांसह काश्मीरमधील पहलगाममध्ये पोहोचली होती. टीना डाबी आणि अतहर आमिर यांच्या विवाहासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या बातम्यांनुसार, आयएएसचे ट्रेनिंग सुरु असताना टीना डाबी आणि अतहर आमिर एकमेकांच्या प्रेमात अडकले होते.
आयएएस टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर अडकले विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 13:40 IST
2015 च्या बॅचचे यूपीएससी टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांनी गेल्या शनिवारी काश्मीरमधील पहलगामध्ये विवाह केला. अहतर आमिर हे मूळचे काश्मीरमधील आहेत. 2015 मध्ये ते यूपीएससीमधील सेकंड टॉपर होते.
आयएएस टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर अडकले विवाहबंधनात
ठळक मुद्देटीना डाबी आणि अतहर आमिर अडकले विवाहबंधनातकाश्मीरमधील पहलगामध्ये केला विवाहआयएएसचे ट्रेनिंग सुरु असताना अडकले एकमेकांच्या प्रेमात