शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! ऐकण्याची क्षमता गमावली पण स्वप्न सोडलं नाही; UPSC क्रॅक केली, IAS अधिकारी झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 14:24 IST

IAS Saumya Sharma : सौम्या शर्मा या दिल्लीच्या रहिवासी आहेत आणि वकील देखील आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लाखो उमेदवार वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून परीक्षा उत्तीर्ण होण्याची तयारी करतात. मात्र, त्यापैकी मोजकेच या परीक्षेत यश मिळवतात. त्यापैकी फक्त काही उमेदवार असे आहेत, ज्यांनी UPSC परीक्षेची तयारी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत पूर्ण केली आहे. निवडलेल्या उमेदवारांच्या तुलनेत UPSC नागरी सेवा परीक्षा त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणारे आणि IAS पद मिळवणारे फारच कमी उमेदवार आहेत.

IAS सौम्या शर्मा यांची गोष्ट ही अशीच प्रेरणादायी आहे. ज्यांनी 2018 साली पहिल्याच प्रयत्नात UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया 9 वा क्रमांक मिळवला. मिळालेल्या माहितीनुसार, सौम्या शर्मा या दिल्लीच्या रहिवासी आहेत आणि वकील देखील आहे. तयारीच्या अवघ्या 4 महिन्यांत त्यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा पास होऊन घवघवीत यश मिळवलं. 

UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी IAS सौम्या शर्मा आदर्श आहेत. सौम्या शर्मा यांची वयाच्या 16 व्या वर्षी ऐकण्याची क्षमता कमी झाली होती, पण त्यांनी IAS होण्याचं स्वप्न सोडलं नाही. शालेय शिक्षणानंतर सौम्या यांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि 2017 मध्ये UPSC परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. सौम्या यांनी या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली आणि कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी