शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कौतुकास्पद! सहावीत नापास झाली, पण हार नाही मानली; कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 15:57 IST

कोणत्याही कोचिंग क्लासच्या मदतीशिवाय त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली आणि ऑल इंडिया सेकंड रँक मिळवला.

लाखो विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करत असतात. असे अनेक विद्यार्थी आहेत जे वर्षानुवर्षे तयारी करतात, पण तरीही त्यांना यश मिळत नाही, तर काही असे आहेत की, जे त्यांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नातच मोठं यश मिळवतात. पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवासी रुक्मणी रियार या देखील त्यापैकीच एक आहेत. कोणत्याही कोचिंग क्लासच्या मदतीशिवाय त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली आणि ऑल इंडिया सेकंड रँक मिळवला. आयएएस रुक्मणी रियार यांची यशोगाथा जाणून घेऊया...

रुक्मणी रियार या लहानपणी अभ्यासात फारशा हुशार नव्हत्या आणि त्यामुळे त्या सहावीत नापास झाल्या, पण त्यानंतर त्यांनी खूप मेहनत केली, घवघवीत यश मिळवलं. आज प्रत्येकजण त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुक्मणी यांनी गुरुदासपूरमध्ये तिसरीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या डलहौजीच्या सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये गेल्या.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रुक्मणी यांनी अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून सोशल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं, त्यात त्यांना गोल्ड मेडल मिळालं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रुक्मणी यांनी अनेक ठिकाणी इंटर्नशिपही केली आणि त्याच दरम्यान त्यांचं लक्ष यूपीएससीकडे गेलं. 

UPSC ची तयारी सुरू केली आणि आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे साध्य केलं. काही लोक वर्षानुवर्षे यासाठी खूप तयारी करतात. रिपोर्ट्सनुसार, रुक्मणी यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी कोणतंही कोचिंग घेतलं नाही, स्वत: अभ्यास केला. २०११ मध्ये, यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया सेकंड रँक मिळविला आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या.

UPSC ची तयारी करण्यासाठी रुक्मणी यांनी सहावी ते बारावीपर्यंत NCERT च्या पुस्तकांचा अभ्यास केला होता आणि दररोज वर्तमानपत्रं आणि मासिकं वाचण्याची सवय लावली होती. या गोष्टींमुळे त्यांना मुलाखतीत खूप मदत झाली. त्यांनी गेल्या अनेक वर्षांच्या यूपीएससीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि मॉक टेस्टही दिल्या. त्याचा परिणाम असा झाला की, पहिल्याच प्रयत्नात आयएएस अधिकारी होण्याचं त्यांचं मोठं स्वप्न पूर्ण झालं. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी