शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास पोरी! घरची परिस्थिती बेताची पण 'तिने' हार नाही मानली; बस ड्रायव्हरची लेक झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 12:53 IST

आर्थिक अडचणींसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. प्रीति हुड्डा यांनी सर्व अडथळे पार करून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. याच दरम्यान त्यांना आर्थिक अडचणींसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. प्रीती सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होत्या. प्रीती यांचे कुटुंब हरियाणातील बहादूरगडचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील दिल्ली परिवहन महामंडळ (DTC) मध्ये बस चालक म्हणून काम करत होते. 

प्रीती यांनी UPSC उत्तीर्ण होण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग केले होते. सर्वप्रथम त्यांनी हिंदीत तयारी करण्याचे ठरवले. त्यांनी हिंदीची निवडही केली. मात्र, जेव्हा त्या पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसायला गेल्या तेव्हा त्यांची निराशा झाली. पण त्यांनी स्वत:ला सांभाळले आणि 2017 मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यावेळी 288 व्या रँक आला. आयएएस प्रीती सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होत्या. 10वीत 77 टक्के, तर 12वीत 87 टक्के गुण मिळाले होते. सुरुवातीला प्रीती य़ांना सरकारी सेवेत रुजू होण्यास फारसा रस नव्हता. 

कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे प्रीती यांच्या पालकांनी तिला अभ्यास सोडून लग्न करण्याचा सल्लाही दिला. पण प्रीती अभ्यासात खूप दक्ष होत्या. त्यांनी दिल्लीच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि येथून हिंदीत पदवी संपादन केली. पदवीनंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून हिंदीमध्ये पीएचडीचा अभ्यास सुरू केला. प्रीतीने सांगितले की, आयएएस म्हणून काम करावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. त्यांनी सांगितले की, जेएनयूमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा यूपीएससीची माहिती मिळाली. 

परीक्षेची तयारी कशी करावी?

यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रीती यांनी पूर्णपणे नवीन मार्ग स्वीकारला. याच दरम्यान त्यांनी अभ्यासासोबतच स्वत:लाही वेळ दिला. जास्त वेळ बसून 10-10 तास अभ्यास करण्यापेक्षा थोडा विचारपूर्वक अभ्यास करायला हवा, असे त्यांनी सांगितले. यूपीएससी परीक्षेची तयारी करताना जीवनाचा आनंद घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत आहे. तरुणांनी भरपूर पुस्तके वाचण्यावर भर न देता पूर्ण आत्मविश्वासाने अभ्यासक्रम कव्हर करावा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी