शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; मोदींनाही ई-मेल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 08:58 IST

राज्याच्या मुख्य सचिवांकडे राजीनामा सुपूर्द; काँग्रेसची राज्य सरकारवर टीका

चंदिगढ: सरकारी कर्तव्य बजावताना असुरक्षित वाटत असल्याचं कारण देत २०१४ च्या हरयाणा केडरच्या आयएएस अधिकारी राणी नागर यांनी राजीनामा दिला आहे. राणी नागर सध्या आर्काइव्ह्स विभागाच्या संचालिका म्हणून काम करत होत्या. राणी यांनी वैयक्तिक सुरक्षेचं कारण देत राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसनं राज्य सरकारला लक्ष्य केलं. राणी यांचा राजीनामा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं अपयश नाही का, असा सवाल काँग्रेसनं विचारला आहे. राणी नागर यांनी काल त्यांचा राजीनामा राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवला. माझा राजीनामा केंद्र सरकारमधील योग्य विभागाकडे पाठवण्यात यावा, अशी विनंतीदेखील त्यांनी केली. राजीनाम्याची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, हरयाणाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे पाठवणार असल्याचं राणी यांनी सांगितलं. सरकारी कर्तव्यावर असताना सुरक्षित वाटत नसल्यानं राजीनामा देत आहे, असं राणी यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.मी आज (४ मे २०२०) अतिशय नम्रपणे भारतीय प्रशासकीय सेवेतील माझ्या पदाचा आज राजीनामा देत आहे, असं राणी यांना पत्रात नमूद केलं आहे. त्यांनी फेसबुक पेजवरदेखील राजीनाम्याचं पत्र शेअर केलं. त्यानंतर त्या चंदिगढमधून त्यांच्या गाझियाबादमधील घरी निघून गेल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन संपल्यानंतर आपण राजीनामा देणार असल्याचं राणी यांनी काही दिवसांपूर्वीच एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं.राणी नागर जून २०१८ मध्ये चर्चेत आल्या होत्या. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या पदावरील अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यानं हे आरोप फेटाळले होते. डिसेंबर २०१७ मध्ये राणी नागर सिरसा जिल्ह्यातल्या डबावलीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यावेळी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात बेकायदा प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर नागर यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तत्काळ कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला होता.